शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

दारूला महागाईची झिंग, राज्यात देशी-विदेशी मद्याच्या किमतीत भरमसाठ वाढ; विदेशी मद्याची सर्वाधिक ५५ ते ८५ रुपये भाववाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 07:40 IST

Maharashtra Liquor Prices News: आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या राज्य सरकारने मंगळवारी मद्याच्या दरात तब्बल ९ ते ७० टक्के अशी भरमसाठ वाढ करण्याचा निर्णय घेतला. मद्याच्या दराबरोबरच मद्य विक्रीसाठी दिल्या जाणाऱ्या परवाना शुल्कातही वाढ करण्यात आली आहे.

मुंबई - आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या राज्य सरकारने मंगळवारी मद्याच्या दरात तब्बल ९ ते ७० टक्के अशी भरमसाठ वाढ करण्याचा निर्णय घेतला. मद्याच्या दराबरोबरच मद्य विक्रीसाठी दिल्या जाणाऱ्या परवाना शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या दरात सर्वाधिक ५५ ते ८५ रुपये वाढ करण्यात आली आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीत दरवर्षी १४ हजार कोटी रुपयांची भर पडणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा महसूल वाढविण्याच्या दृष्टीने सचिवस्तरीय अभ्यासगट स्थापन करण्यात आला होता. या गटाने मद्यनिर्मिती धोरण, लायसन्स, उत्पादन शुल्क तसेच कर संकलन वाढीसाठी इतर राज्यातील धोरणात्मक बाबींचा अभ्यास करुन शासनास अहवाल सादर केला होता. त्या अनुषंगाने मद्याच्या सुधारित विक्री दरात वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. 

‘महाराष्ट्र मेड लिकर’, नवा ब्रँडमहाराष्ट्र मेड लिकर (एमएमएल) हा धान्याधारित विदेशी मद्याचा नवीन प्रकार तयार करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. फक्त महाराष्ट्रातील मद्य उत्पादक असे उत्पादन करु शकतील. त्यांना या नव्या ब्रँडची नोंदणी करणे आवश्यक राहील.दरवाढ कधीपासून? : या निर्णयांचे इतिवृत्त पुढील बैठकीत मंजूर होईल. त्यानंतर जीआर काढून दरवाढ लागू केली जाईल.

क्वार्टर (१८० मिली) आता कितीला पडेल?मद्याचा प्रकार    जुना दर    नवीन दरदेशी मद्य    ७० रुपये    ८० रुपयेमहाराष्ट्र मेड लिकर    नवीन प्रकार    १४८ रुपयेभारतीय बनावटीचे विदेशी मद्य    १२० ते १५० रुपये    २०५ रुपयेविदेशी मद्याचे प्रिमियम ब्रँड    ३३० रुपये    ३६० रुपये 

परवाना शुल्कात किती झाली वाढ?विविध सीलबंद विदेशी मद्य विक्री परवाना (एफएल-२) व परवाना कक्ष हॉटेल/रेस्टॉरंट परवाना (एफएल-३) करार करून भाडेतत्त्वावर चालवता येईल. त्याकरिता वार्षिक लायसन्ससाठी अनुक्रमे १५ टक्के व १० टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येईल.यापूर्वी दरवाढ कधी?यापूर्वी २०२२ मध्ये देशी दारूच्या दरात वाढ झाली होती. मात्र, विदेशीच्या दरात २०११ पासून वाढ झाली नव्हती. त्यामुळे १४ वर्षानंतर ७० टक्क्यांपर्यंत वाढ झाली.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार