शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

⁠⁠⁠⁠⁠थेट सरपंचासाठी फिक्कट निळ्या रंगाची मतपत्रिका, निवडणूक आयोगाच्या सूचना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 18:25 IST

राज्यात आॅक्टोबर २०१७ ते फेबु्रवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाºया आठ हजार ४३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची लगबग सध्या सुरू आहे.

अमरावती, दि. 24 -  राज्यात आॅक्टोबर २०१७ ते फेबु्रवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाºया आठ हजार ४३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची लगबग सध्या सुरू आहे. यासर्व ठिकाणी थेट जनतेमधून सरपंच निवडले जाणार असल्याने निवडणूक आयोगाची त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. यासंदर्भात सरपंचपदाचे अर्ज, घोषणापत्रे कसे राहणार, हे आयोगाने २३ आॅगस्टला निश्चित केले आहे. या निवडणुकीत सरपंचपदासाठी ‘ईव्हीएम’वर फिक्कट निळ्या रंगाची मतपत्रिका लावण्यात येणार आहे. 

सरपंचाच्या निवडणुकीकरिता ग्रामपंचायतीच्या ज्या संबंधित प्रभागातून उमेदवारी अर्ज भरण्यात येतील, त्या ग्रामपंचायतीचे नाव व प्रभाग क्रमांक स्पष्टपणे नमूद करावा लागणार आहे. उमेदवार राखीव प्रभागातून निवडणूक लढवीत असल्यास अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग या राखीव प्रवर्गासाठी अधिनियम-२००४ च्या तरतुदींना अनुसरून सक्षम प्राधिकाºयाने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र याची सत्यप्रत जोडावी लागणार आहे. तसेच उमेदवारी अर्जाच्या छाननीच्या वेळी पडताळणीसाठी मूळ जातीप्रमाणपत्र व जातपडताळणी समितीने दिलेले वैधताप्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास जातवैधता समितीकडे अर्ज केल्याचा पुरावा जोडणे आवश्यक आहे.

उमेदवार दुस-या प्रभागातील असल्यास त्याबाबतचा उतारा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे १ जानेवारी १९९५ रोजी किंवा त्यानंतर  जन्मलेल्या व्यक्तीकडे किमान शालेय शिक्षणातील इयत्ता ७ वीची परीक्षा उतीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा सक्षम प्राधिकाºयांनी प्रमाणित केल्याप्रमाणे ७ व्या इयत्तेशी समतुल्य शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

- तर सरपंच ठरणार अपात्र* १२ सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य झाल्यास, निवडून आल्याचे सहा महिन्यात आत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास, निवडणूक निकाल लागल्याचे ३० दिवसांचे आत निवडणूक खर्च सादर न केल्यास सरपंच अनर्ह ठरणार आहे.* जंगम मालमत्तेचा तपशील, कंपन्यांची बंधपत्रे, कर्जरोखे, स्थावर मालमत्तेचा तपशील, सार्वजनिक वित्तीय संस्था यांचकडील व निमशासकीय संस्थाकडील दायित्वे, थकीत रक्कमेचा तपशील, बँकांचे कर्ज, शासकीय, निमशासकीय देणी, एखादे पद धारण करीत अथवा केले असल्यास त्यांच्याकडील नादेय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.