शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याची जन्मठेप कायम

By admin | Updated: April 13, 2015 04:44 IST

स्वत:च्याच मुलीवर सतत दोन वर्षे बलात्कार करणाऱ्या किसन सूरजमल गेहलोत या ४३ वर्षांच्या नराधम पित्याला सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने अपिलातही कायम केली.

मुंबई : स्वत:च्याच मुलीवर सतत दोन वर्षे बलात्कार करणाऱ्या किसन सूरजमल गेहलोत या ४३ वर्षांच्या नराधम पित्याला सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने अपिलातही कायम केली.आनंदीबाई चाळ, जिजामाता स्कूलसमोर, कुरार गाव, मालाड (प.) येथे राहणाऱ्या किसनला सत्र न्यायालयाने सप्टेंबर २००४ रोजी जन्मठेप ठोठावली होती. त्याविरुद्ध किसनने नऊ वर्षांच्या विलंबाने केलेले अपील न्या. पी. व्ही. हरदास व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने फेटाळले. सत्र न्यायालयाने सर्व साक्षीपुराव्यांचा साकल्याने विचार करून किसनला ठोठावलेली शिक्षा योग्यच आहे. आरोपीने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप पाहता त्याला जराही दया दाखविता येणार नाही, असे खंडपीठाने नमूद केले.सूरजने सप्टेंबर २००१ ते २००३ या काळात स्वत:च्याच मुलीवर राहत्या घरात सतत बलात्कार केले होते. १६ सप्टेंबर २००३ रोजी सकाळी या मुलीने हा प्रकार सर्वप्रथम आपला भाऊ प्रमोद व काका कांतीलाल यांना सांगितला. ते दोघे तिला घेऊन कुरार पोलीस ठाण्यात गेले व तिने फिर्याद नोंदविल्यावर किसनला अटक झाली.पित्याने दम दिल्याने व बभ्रा केला तर आपलीही अभ्रू चव्हाट्यावर येईल या भीतीने ही मुलगी जन्मदात्याकडूनच केले जाणारे हे अत्याचार दोन वर्षे निमूटपणे सोसत राहिली. मात्र १६ एप्रिल २००३ रोजी नराधम बापाने अमानुषतेचा कळस गाठला. धाकटा भाऊ सकाळी ६.३० वाजता शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडताच किसनने मुलीवर बलात्कार केला, पण तिची मासिक पाळी चालू आहे, याची पर्वाही त्याने केली नाही. बरे वाटत नाही म्हणून शाळेत गेलेला भाऊ थोड्याच वेळात परत आला रडणाऱ्या बहिणीकडे त्याने चौकशी केली तेव्हा झाला प्रकार उघड झाला. विशेष असे की, ज्या घरात किसनने हा किळसवाणा प्रकार केला ते एका खोलीचे असून, मध्ये पार्टिशन घातलेले आहे. पार्टिशनच्या पलीकडे दुसरे कुटुंब राहते. (विशेष प्रतिनिधी)