शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

लाइफलाइन दुपटीने महागली

By admin | Updated: June 21, 2014 12:38 IST

‘अच्छे दिन आनेवाले हैं’ असे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने वास्तवात येऊ घातलेल्या ‘बुरे दिन’ची चुणूक शुक्रवारी दाखविली.

अच्छे नव्हे, बुरे दिन : रेल्वेचे प्रवासी भाडे 14} तर मालभाडे 6} महागले, देशभर संताप
नवी दिल्ली : रेल्वेच्या प्रवासी भाडय़ात 14.2 टक्के तर मालभाडय़ात 6.5 टक्के वाढ करून ‘अच्छे दिन आनेवाले हैं’ असे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने वास्तवात येऊ घातलेल्या ‘बुरे दिन’ची चुणूक शुक्रवारी दाखविली. सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणा:या मुंबईतील उपनगरीय लोकल सेवेच्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. मुंबईतील लोकल प्रवासात सर्वाधिक पास वापरणा:या प्रवाशांचे प्रमाण असून, पासच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे प्रथम श्रेणी प्रवाशांना याचा मोठा फटका बसेल. रेल्वेची एकाच वेळी केली गेलेली ही सर्वाधिक भाडेवाढ आहे. मात्र तिकीटदरातील वाढ अल्प आहे. 
महागाईने त्रस्त झालेली जनता आणखी होरपळणार असून, त्याविरुद्ध देशभर संताप व्यक्त केला जात आहे. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काही अप्रिय असे कठोर आर्थिक निर्णय घ्यावे लागतील, याचे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवडय़ात गोव्यात केले होते. मोदींच्या औषधोपचारांची रेल्वे भाडेवाढ ही पहिली कडू गोळी आहे. ही भाडेवाढ 25 जूनपासून लागू होईल. 
पंतप्रधानांशी बोलून भाडेवाढीचा निर्णय घेतला जाईल, असे सांगणा:या रेल्वेमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी रीतसर पत्रकार परिषद घेऊन भाडेवाढ जाहीर करण्याचेही सौजन्य दाखविले नाही. देशातील प्रवासी जनतेवर तब्बल आठ हजार कोटी रुपयांचा बोजा टाकणारा हा निर्णय रेल्वे मंत्रलयाने एक निवेदन प्रसिद्ध करून जाहीर केला.              (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
मुंबईकरांच्या पासदरात भरमसाठ वाढ
च्पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रलर्पयतचा द्वितीय श्रेणीचा पास अंदाजे 85 वरून 150 रुपये होईल, तर प्रथम श्रेणीचा पास 300 रुपयांवरून 625 रुपये होईल. 
च्चर्चगेट ते बोरीवली आणि विरार्पयतच्या द्वितीय श्रेणीच्या पासात अनुक्रमे 290 रुपये आणि 365 रुपये वाढ असेल. याच प्रथम श्रेणीच्या पासात अनुक्रमे 655 रुपये आणि 925  रुपये एवढी वाढ असेल. 
च्मध्य रेल्वेवरील द्वितीय श्रेणीच्या पाससाठी सीएसटी ते ठाणो अंदाजे 290 रुपये, तर कल्याणर्पयत 365 रुपये जादा लागणार आहेत. याच मार्गावर प्रथम श्रेणी पाससाठी 655 आणि 995 रुपये माजावे लागतील. 
च्सीएसटी ते वाशी आणि पनवेलच्या प्रथम आणि द्वितीय श्रेणीच्या पाससाठीही 400 आणि 385 आणि 610, 925 रुपये जादा मोजावे लागणार आहेत.