शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

जीवन प्राधिकरणातही बाजोरियांचे घोटाळे

By admin | Updated: July 31, 2016 04:19 IST

सार्वजनिक बांधकाम आणि सिंचन विभागातील कंत्राट गैरप्रकारांमुळे गाजत असताना आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील गोंधळही पुढे आला

नागपूर : यवतमाळच्या बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीचे सार्वजनिक बांधकाम आणि सिंचन विभागातील कंत्राट गैरप्रकारांमुळे गाजत असताना आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील गोंधळही पुढे आला आहे. बाजोरिया कन्स्ट्रक्शनच्या जीवन प्राधिकरणातील कंत्राटांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका(क्रमांक३४़/२०१५) यवतमाळच्या जागरुक युवकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे.ओम पंजाबराव ठाकरे (उमरसरा यवतमाळ) असे या युवकाचे नाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया आणि त्यांचे बंधू यवतमाळ नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक सुमित बाजोरिया यांच्याशी संबंधित ही बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. या कंपनीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नियमबाह्य कामे करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यासाठी त्यांना प्राधिकरणाच्या अभियंत्यांचे पाठबळ लाभल्याचे याचिकेत म्हटले आहे. याचिकाकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार, करजगाव, धुळापूर, सांगली (रेल्वे) प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचा कालावधी १८ महिने होता. कामाचे मूल्य ३ कोटी २७ लाख ७ हजार ८१७ रुपये होते. बाजोरिया कंपनीने हे काम १० वर्षे ६ महिने चालू ठेवले. करारनाम्याच्या अट क्रमांक २ आणि ३ अंतर्गत आवश्यक कार्यवाही करून कंत्राटदारावर उत्तरदायित्व निश्चित करण्याऐवजी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता अंतिम देयक तयार केले गेले. बाजोरिया कंपनीने अपूर्णावस्थेत सोडलेले हे काम पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या निविदा काढण्यात आल्या. पुन्हा निविदा काढण्याचे कृत्य करण्यामागे बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला उपकृत करुन त्या कंपनीचे उत्तरदायित्व समाप्त करण्याचा घाट आहे. ते कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाही. या उलट संबंधित कार्यकारी अभियंत्याने अपूर्ण अवस्थेत असलेले काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले असून त्याचा जावक पुस्तिका क्रमांक १२६४ असा दाखविण्यात आला आहे. परंतु जावक पुस्तिकेत या क्रमांकावर असे प्रमाणपत्र निर्गमित केल्याची नोंदच नाही. याच प्रमाणपत्रात काम पूर्ण झालेले असून, संबंधित विभागाला हस्तांतरित करण्यात आल्याची नोंद आहे. परंतु याच विभागाने जिल्हा परिषद पाणीपुरवठा योजना यांना पाठविलेल्या अहवालात काम हस्तांतरित झालेले नसल्याचे कळविले आहे.बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीचे सार्वजनिक बांधकाम आणि सिंचन विभागातही अनेक घोळ आहे. त्यासंबंधीही याचिका दाखल आहे.न्यायालयाने याप्रकरणी जीवन प्राधिकरणाला नोटीस बजावली असून शपथपत्र मागितले आहे. त्यावर गुरूवार ४ आॅगष्ट रोजी पुढील सुनावणी होत आहे. (प्रतिनिधी)