शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा वाहतूक केल्यास परवाना होणार रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 07:04 IST

एफडीएकडून विविध उपाययोजना; शासनाने कारवाई करण्याचा प्रस्ताव केला मान्य

- राहुल शिंदे पुणे : राज्यात गुटखा, पानमसाला आदी प्रतिबंधित पदार्थांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. मात्र, अवैध वाहतूक करून हे पदार्थ पुण्यासह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये विक्रीसाठी आणले जातात. परंतु, या पुढील काळात प्रतिबंधित पदार्थाची वाहतूक करणाऱ्या चालकाचा व वाहनाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.राज्यात गुटखाबंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास अनेक अडचणी येत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये कर्नाटक, गुजरात आदी राज्यांतून कोट्यवधी रुपयांचा गुटखा पुणे शहर व परिसरात दाखल झाल्याचा घटना समोर आल्या आहेत. त्यातच पुणे शहरात अनेक ठिकाणी गुटख्याची अवैध विक्री होत असल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षी अन्न व औषध प्रशासनातर्फे ७५ ठिकाणी धाडी टाकून तपासणी करून १ कोटी १९ लाखांचा गुटखा जप्त केला. काही महिन्यांपूर्वी शिरूर, बारामतीसह येरवडा, निगडी, पिंपरी-चिंचवड परिसरात एफडीएकडून गुटख्यावर कारवाई केली. त्यामुळे केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही गुटख्याची अवैध वाहतूक व विक्री होत असल्याचे समोर आले आहे. केवळ ट्रक किंवा टेम्पोमधूनच नाही तर प्रवासी वाहतूक करणाºया बसमधूनही वाहतूक होत असल्याचे एफडीएच्या कारवाईत आढळून आले आहे. गुटखाबंदीच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनासह एफडीएकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्याचा फारसा फायदा झाला नाही. त्यामुळे गुटख्याची वाहतूक करणाºया वाहनाचा वाहतूक परवाना आणि चालकाचा परवाना दोन्ही रद्द करण्याची कारवाई करावी, याबाबत एफडीकडून शासनाकडे व परिवहन विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. तसेच या प्रस्तावास मान्यता मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात होता. शासनाने नुकताच हा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यामुळे गुटखा, पानमसाला आदी प्रतिबंधित मालाची वाहतूक करणाºयांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थाची मोटर वाहनातून वाहतूक होत असल्याचे आढळल्याने प्रकरण न्यायालयात दाखल करावे. तसेच मोटर वाहन कायद्या कलम १९ (१) (सी) अन्वये चालकास वाहन चालविण्यापासून प्रतिबंधित करण्याबाबत संबंधित अधिकाºयाला सूचित करावे, असे परिपत्रक अन्न व औषध प्रशासनिक विभागाकडून काढले आहे.एफडीएशी संपर्क कराप्रतिबंधित अन्नपदार्थाची वाहतूक करणारी वाहने राज्याच्या मोटर वाहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावर किंवा इतर नियमित वाहन तपासणीच्या वेळी निदर्शनास आल्यास सीमा तपासणी अधिकाºयाकडून वाहनाच्या परवान्यावर कारवाईसाठी ताब्यात घेतले जाते. एफडीएच्या अधिकाºयांनी संबंधित अधिकाºयांशी संपर्क साधावा, असेही एफडीएच्या परिपत्रकात नमूद केले आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र