शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार चौरस फुटांपर्यंतच्या घरांना 10 दिवसांत परवाना- नगरविकासमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 03:25 IST

युनिफाइड डीसीपीआरमुळे सुटसुटीतपणा

अहमदनगर : बांधकाम क्षेत्रासाठी राज्य सरकारने ‘एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली’ (युनिफाइड डीसीपीआर) लागू केली असून, त्यामुळे बांधकाम प्रक्रिया सुटसुटीत होणार आहे. त्याच अनुषंगाने आता तीन हजार चौरस फुटांपर्यंतच्या घरांना केवळ १० दिवसांत बांधकाम परवानगी दिली जाईल. वाढीव एफएसआयसह बांधकामाबाबतचे अनेक महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतल्याने लोकांना स्वस्तात घरे मिळतील, असा विश्वास नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात नगरविकास आढावा बैठक झाली.  त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, नवीन एकसमान बांधकाम नियमावलींच्या अंमलबजावणीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.  पूर्वी राज्यात प्रत्येक नगरपालिका व महापालिकेतील बांधकाम नियम वेगळे होते. त्यात अनेक त्रुटी होत्या. यामुळे बांधकाम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. संपूर्ण राज्यात बांधकामाबाबत एकसमान नियमावली असावी, अशी मागणी होती. त्यामुळे हा निर्णय घेऊन शेवटच्या घटकापर्यंत त्याची माहिती व्हावी, म्हणून प्रत्येक जिल्ह्याचा दौरा सुरू आहे. वाढीव एफएसआय मिळणारया निर्णयात बांधकाम करताना वाढीव एफएसआय दिला जाणार आहे. त्यामुळे त्याबाबत तक्रारी होणार नाहीत. इमारतीची उंची ५० मीटरपर्यंत वाढवण्याचाही निर्णय केला आहे. परिणामी, विकासकाला फायदा होऊन घरांच्या किमती कमी होतील. एखादी रहिवास इमारत बांधली, तर त्यात एक मजला सोसायटीच्या लोकांना सार्वजनिक वापरासाठी काढता येणार आहे. राहण्यासाठी दीड हजार चौरस फुटांपर्यंतच्या घराला केवळ बांधकाम नकाशा व विकास शुल्क लागेल. अन्य कोणतीही परवानगी लागणार नाही. तीन हजार चौरस फुटांपर्यंतच्या घरांना केवळ १० दिवसांत परवानगी मिळेल. यामुळे अनधिकृत बांधकामांना आळा बसेल, असे शिंदे म्हणाले. झोपडपट्टी पुनर्विकास योजना नगरमध्येहीझोपडपट्टी पुनर्विकास योजना पूर्वी, मुंबई- ठाण्यापुरती मर्यादित होती; परंतु आता ती इतर शहरांमध्येही राबवण्यात येईल. नगरमध्ये २२ झोपडपट्ट्या आहेत. त्यांच्यासाठीही ही योजना लागू करून त्यांना हक्काची घरे दिली जातील, असे शिंदे म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे