शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

‘वाचन प्रेरणा दिना’आधी ग्रंथालये सुरू होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 02:36 IST

विश्वसनीय सूत्रांची माहिती; ग्रंथालय संचालनालयाच्या प्रस्तावावर सरकार सकारात्मक

- स्वप्निल कुलकर्णी मुंबई : लॉकडाऊनमुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असणाऱ्या राज्यातील ग्रंथालयांची सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला. ग्रंथालय संचालनालयाने सादर केलेल्या प्रस्तावावर शासन सकारात्मक असून, येत्या ‘वाचन प्रेरणा दिना’पूर्वीच राज्यातील शासकीय ग्रंथालये सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील एकवीस हजारांहून अधिक ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.१ आॅक्टोबरनंतर सुरू झालेल्या अनलॉकच्या पाचव्या टप्प्यातही सार्वजनिक ग्रंथालये सुरू करण्याबाबत विचार झाला नव्हता. ‘लोकमत’ने याबद्दल २८ सप्टेंबर रोजी ‘मानसिक कोंडी संपण्यासाठी ग्रंथालयांची कवाडे खुली करा’ हे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत आणि ग्रंथालय संचालनालयातर्फे ग्रंथालय सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला.या प्रस्तावावर शासन सकारात्मक असून, योग्य ती सुरक्षिततेची आणि मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करून वाचन प्रेरणादिनी किंवा १५ आॅक्टोबरच्या आसपास ग्रंथालये सुरू करण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. तसेच ग्रंथालय, अभ्यासिका या गोष्टी थोड्या फार काळात सुरू होतील. त्याचा तपशील काही दिवसात स्पष्ट होईल, असे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. राज्यात सध्या १२ हजार १४९ शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये आहेत. ती बंद असल्याने कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे.ग्रंथालय संचालनालयाने सुचविलेली कार्यप्रणाली१) प्रतिबंधात्मक क्षेत्रातील ग्रंथालये बंदच राहतील.२) ग्रंथालयांमध्ये सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर, आॅक्सिमीटरची व्यवस्था करावी.३) ग्रंथालयांमध्ये मास्क वापरणे अनिवार्य करावे.४) वाचकांकडून आलेले ग्रंथ किमान दोन दिवस ‘विलगीकरण कप्प्यात’ ठेवावेत.५) वाचक कक्ष, अभ्यासिकेमध्ये ५०% अभ्यासक, वाचकांना बसण्यास परवानगी द्यावी.६) वाचक आणि कर्मचाºयांमध्ये १ मीटरचे अंतर असावे.ग्रंथालयीन सेवा सुरू करण्यासाठी आम्ही आधीपासूनच तयारी करत होतो. त्याबद्दल आवश्यक कार्यप्रणालीचा प्रस्ताव आम्ही शासनाला सादर केला आहे. शासन त्याबद्दल सकारात्मक आहे. १५ आॅक्टोबरपूर्वीच ग्रंथालयीन सेवा सुरू होतील, असा विश्वास आहे.- शालिनी इंगोले, प्रभारी ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई