शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
5
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
7
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
8
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
9
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
10
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
11
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
12
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
13
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
14
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
15
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
16
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
17
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
18
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
19
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
20
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

ब्रिटिश कंपनीने भारत सरकारला दिले पत्र; सांगितले भीमा नदीवरील पुलाचे आयुष्य संपले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 15:19 IST

डिकसळचा पुल बनला धोकादायक; तरीही जडवाहतुक नियमितपणे सुरूच

ठळक मुद्देब्रिटिशकालीन डिकसळचा पूल जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या देखभालीखाली गेल्या पाच वर्षांपूर्वी या पुलाची डागडुजी करण्यात आली सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या पुलाचे स्ट्रक्चरल  आॅडिट होते, डिकसळच्या पुलावरून जडवाहतुकीस बंदी आहे.

नासीर कबीरकरमाळा : सोलापूर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यास जोडणारा भीमा नदीवर ब्रिटिशांनी  १८५५ साली डिकसळचा पूल बांधला. त्या पुलास आज  १६४ वर्षे पूर्ण झाली असून, पुलाचे आयुष्य सन २००० सालात संपल्याचे ब्रिटिश कंपनीने भारत सरकारला पत्राव्दारे कळवले आहे. तरीही गेल्या १८ वर्षांपासून डिकसळच्या पुलावरून जडवाहतूक सुरूच आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिटच झालेले नाही. त्यामुळे डिकसळचा पूल धोक्याचा रे बाबा..ऽऽ असे ओरडून सांगण्याची वेळ आली आहे. 

या ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाचा उपयोग करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील जिंती, कोंढारचिंचोली, टाकळी, केत्तूर नं.१, २, वाशिंबे, गोयेगाव, कुुंभारगाव, सावडी, दिवेगव्हाण, कात्रज, खातगाव, पोमलवाडी, हिंगणी, गुलमोहोरवाडी, भगतवाडी, घरतवाडी, राजुरी, सोगाव, रामवाडी, कावळवाडी, भिलारवाडी, उम्रड, मांजरगाव, उंदरगाव आदी ३५ गावातील लोक पुणे जिल्ह्यात जवळच्या मार्गाने जाण्यासाठी करत आहेत. 

या ब्रिटिशकालीन पुलाची देखभाल दुरूस्ती जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे आहे. पुलाचे आयुष्य तब्बल १६४ वर्षे झाले आहे. पुलाचे मॅपिंग सपोर्ट कमकुवत बनले असून ठिकठिकाणी पुलाच्या भिंतीस तडे जाऊन झाडे उगवली आहेत.

 डिकसळ पुलावरून जड वाहनास जा-ये करण्यासाठी बंदी असूनही सर्रास वाळूच्या गाड्यांची वाहतूक होत असते. साखर कारखान्याकडे उसाची वाहतूकही याच पुलावरून नियमित होते. पुलाच्या दोन्ही बाजूने जडवाहनास जाता येऊ नये म्हणून लोखंडी बॅरिकेड लावूनही त्या बॅरिकेडला वळसा मारून बेमालूमपणे जीवाची पर्वा न करता जड वाहतूक सुरू आहे.

करमाळा ते जामखेड जिल्हा मार्गावरील पोथरे नजीक कान्होळा नदीवरील पूल, उस्मानाबाद-दौंड राज्यमार्गवरील वीट येथील पूल व वीट ते अंजनडोह मार्गावरील पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट नुकतेच झाले आहे. असे सार्वजनिक बांधकाम करमाळा उपविभाग  चे उपकार्यकारी अभियंता अमित निमकर यांनी ंसांगितले.

असा आहे पुलाचा इतिहास- सोलापूर जिल्ह्यातील करमाळा व पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका सीमेवर डिकसळ येथे तब्बल अर्धा कि.मी. लांबीचा डिकसळचा पूल दक्षिणोत्तर रेल्वे मार्ग जोडण्यासाठी ब्रिटिशांनी बांधला. या पुलावरून १९७० पर्यंत रेल्वे धावली. पुढच्या काळात रेल्वेचा मार्ग खानोटा ते भिगवण रेल्वेने बांधलेल्या पुलावरून वळविण्यात आला. 

धोका वाढलाय..- आजतागायत ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाचा उपयोग करमाळा तालुक्यातील ३५ गावचे नागरिक करीत आहेत. आता तर कोर्टी ते टाकळी हा ३० कि.मी.चा रस्ता केंद्रीय मार्ग निधीतून चकाचक झाल्याने संपूर्ण करमाळा तालुक्यातून पुण्याकडे भिगवणमार्गे जाणारी वाहतूक याच डिकसळ पुलावरून सुरू झाली आहे.

ब्रिटिशकालीन डिकसळचा पूल जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या देखभालीखाली येत असून गेल्या पाच वर्षांपूर्वी या पुलाची डागडुजी करण्यात आली आहे. स्ट्रक्चरल आॅडिट झाले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या पुलाचे स्ट्रक्चरल  आॅडिट होते. डिकसळच्या पुलावरून जडवाहतुकीस बंदी आहे.       - एस.एल. माने, बांधकाम अभियंता, जि.प.उपविभाग, करमाळा

टॅग्स :Solapurसोलापूरroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक