शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी टोकाचा संघर्ष करू- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 02:31 IST

सरकार आरक्षणच्या प्रश्नावर टोलवाटोलवी करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

मुंबई : मराठा तरुणांना आरक्षण मिळायलाच हवे, आरक्षण न मिळाल्यास टोकाचा संघर्ष करू, अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानातील आंदोलकांची फडणवीस यांनी मंगळवारी भेट घेतली. सरकार आरक्षणच्या प्रश्नावर टोलवाटोलवी करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.उच्च न्यायालयात आतापर्यंत फक्त महाराष्ट्र आणि तामिळनाडूचे आरक्षण टिकले. आमच्या सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेले, तेव्हा आम्ही तयारी केली होती. न्यायालयानेही स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यानंतर, आताच्या सरकारच्या काळात सुनावणी झाली. या सरकारने न्यायालयाने विचारले नसतानाही ‘आ बैल मुझे मार’ म्हटल्याप्रमाणे कोणती भरती करणार नाही वगैरे भूमिका घेतली. अशी भूमिका मांडण्याची गरज नव्हती, न्यायालयाने तसे विचारलेही नव्हते. त्यापेक्षा आतापर्यंत ज्या नियुक्त्या दिल्या, त्या ठीक आहेत. मात्र, तुमच्या आदेशापर्यंत नव्या नियुक्त्या करणार नाही, असे न्यायालयाला सांगितले असते, तर बरे झाले असते, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.महाविकास आघाडी सरकारने जर मनात आणले, तर काही ना काही मार्ग काढता येऊ शकेल. दुर्दैवाने या सरकारमध्ये टोलवाटोलवीशिवाय काहीही होत नाही. मात्र, जोपर्यंत हा प्रश्न निकाली लागत नाही, तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करू. मराठा आरक्षण हा राजकीय प्रश्न नाही, हा तरुणांचा प्रश्न आहे. सरकारने मार्ग काढायला हवा, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानातील आंदोलकांची फडणवीस यांनी मंगळवारी भेट घेतली. सरकार आरक्षणच्या प्रश्नावर टोलवाटोलवी करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.सुप्रिया सुळे यांनीही घेतली आंदोलकांची भेटn मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईतील आझाद मैदान इथे आंदोलन करत असलेल्या सकल मराठा समाजाच्या युवकांची भूमिका जाणून घेण्यासाठी मंगळवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी मराठा समाजातील युवकांना आश्वासन नाही, तर स्थिरता हवी असल्याचे त्या म्हणाल्या. n हे सर्व आपल्या महाराष्ट्राचे युवक आहेत, त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, हाच आमचा प्रयत्न असून, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी आपण लवकरच चर्चा करणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षण