शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

नागपुरातील धानपट्ट्यात दमदार पाऊस पडू दे, स्थानिकांचं देवाकडे साकडं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 10:33 PM

पावसानं दडी दिल्यानं नागपुरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यामुळे ‘देवा धानपट्ट्यात दमदार पाऊस पडू दे’असे साकडे ते घालत आहेत.

गणेश खवसे/नागपूर, दि. 12 - असमाधानकारक पावसामुळे नागपूर जिल्ह्याचा धानपट्टा म्हणून ओळख असलेल्या मौदा तालुक्यातील ७५ टक्के धान रोवणी खोळंबली आहे. तीन दिवसांपूर्वी थोडा पाऊस झाला. मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने पाठ फिरविली. परिणामी धान रोवणी थांबली असून धान उत्पादक चिंताग्रस्त आहेत. यासाठी मौदा तालुक्यात कुठे महाप्रसाद, कुठे जलपूजन, तर कुठे दिंडी काढण्यात येत आहे. ‘देवा धानपट्ट्यात दमदार पाऊस पडू दे’अशा प्रकारे साकडे ग्रामस्थ घालत आहेत. येत्या दोन-चार दिवसांत पावसाने हजेरी लावली नाही तर रोवणी केलेले २५ टक्के धान पीकही हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  मौदा तालुक्यात यावर्षी तालुका कृषी विभागाने ३७ हजार हेक्टर धान पिकाचे क्षेत्र निर्धारित केले होते. त्यापैकी ९,६१७ हेक्टरमध्ये ७ ऑगस्टपर्यंत धान रोवणी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी धर्मे यांनी दिली. निर्धारित क्षेत्रापैकी केवळ २५ टक्के क्षेत्रात धान रोवणी झाली असून, ७५ टक्के रोवणी पुरेशा पावसाअभावी खोळंबलेली आहे. त्यामुळे समाधानकारक पाऊस पडावा, यासाठी गावोगावी पावसासाठी साकडे घालत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. 

धानोली येथे परमात्मा एक सेवक मंडळाच्यावतीने ग्रामस्थांनी गावभोजना (महाप्रसाद)चे आयोजन केले होते. दुधाळा येथे वरुण देवता प्रसन्न होण्यासाठी हरिनामाच्या गजरात जलपूजन करण्यात आले. भरपूर पाऊस पडावा यासाठी खात येथे चिमुकल्यांनी भजन सादर केले. वैष्णव वारकरी सांप्रदायिक भजन मंडळातर्फे हरिपाठ आणि भजन आयोजित करण्यात आले होते. कोदामेंढी येथील बाजार चौकस्थित हनुमान मंदिरासह तांडा, देवमुंढरी, घोटमुंढरी येथे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. चिरव्हा येथे रविवारी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चाचेर येथेही प्रार्थना करण्यात आली. महिलांनी मंदिरात घागरीने पाणी आणून जलाभिषेक केला. यासोबतच दिंडी मिरवणूक काढण्यात येत आहे. मौदा तालुक्याचे मुख्य पीक हे धान असून, धान रोवणीच खोळंबली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. या हंगामात अद्यापही तालुक्यात दमदार पाऊस झाला नाही. पाण्याची पातळीसुद्धा खालावली आहे. त्यामुळे मौदा तालुका दुष्काळाच्या छायेत आहे.