शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना मृत्युदर राेखण्यासाठी टास्क फोर्समधील तज्ज्ञ देणार धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 03:32 IST

जिल्ह्यातील अतिदक्षता विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

- स्नेहा मोरेमुंबई : राज्यातील कोरोना मृत्युदर कमी करण्यासाठी टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञ जिल्ह्यातील अतिदक्षता विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने हे प्रशिक्षण देण्यात येणार असून याअंतर्गत कोरोना टास्क फोर्समधील तज्ज्ञ सर्व जिल्ह्यांना भेट देतील. प्रत्येक जिल्ह्यातील आढावा घेऊन त्यानुसार रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात येईल.राज्यातील जिल्हा रुग्णालयात देण्यात येणाऱ्या या प्रशिक्षणासाठी खासगी-सरकारी रुग्णालयातील विशेषज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचा मृत्युदर सध्या २.५ टक्के आहे. मात्र सांगली, सातारा, यवतमाळ, भंडारा आणि अमरावती या जिल्ह्यातील मृत्युदर अधिक असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने मांडले. राज्याच्या टास्क फोर्सचे डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले, सर्व जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी जिल्हा आणि मनपा या स्थानिक यंत्रणांना मृत्यू संख्या, मृत्युदर आणि मृत्यू विश्लेषण अहवाल तयार करणे बंधनकारक आहे. त्यानुसार, जिल्हा व मनपा प्रशासनाला याविषयी सूचना देण्यात आली आहे. राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये कोरोना मृत्युदर हा एकूण राज्याच्या मृत्युदरापेक्षा जास्त आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये अधिक लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे. कृती आराखडा तयार करण्यावर भरटास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, अतिदक्षता विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाविषयी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यात जिल्ह्यांमधील लहान-लहान केंद्रातील मनुष्यबळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. केंद्राच्या वतीने राज्यात कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या चमूने प्रशिक्षणाचे निर्देश दिले होते, त्यानुसार हे आयोजन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या