शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कुष्ठरोग विभागाच्या सहाय्यक संचालकाचा जळगावात गळा चिरून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 14:07 IST

कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ. अरविंद सुपडू मोरे (वय ५६, रा.पार्वती नगर, जळगाव, मूळ रा.नाशिक) यांचा धारदार करवतीने गळा चिरून खून झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारीच घडली असावी अशी शक्यता आहे.

जळगाव, दि. 11 - कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ. अरविंद सुपडू मोरे (वय ५६, रा.पार्वती नगर, जळगाव, मूळ रा.नाशिक) यांचा धारदार करवतीने गळा चिरून खून झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारीच घडली असावी अशी शक्यता आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ.मोरे हे १४ जून २०१७ रोजी जळगावात कुष्ठरोग विभागाच्या सहायक संचालक म्हणून रुजू झाले. त्याआधी ते धुळे जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. जिल्हा सामान्य रुग्णालय आवारात त्यांचे स्वतंत्र कार्यालय आहे. चालक जालीम जाधव यांनी सोमवारी सकाळी नऊ वाजता डॉ. मोरे यांना मोबाईलवर संपर्क साधला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सकाळी साडेनऊ वाजता चालक जाधव हे त्यांना घेण्यासाठी पार्वती नगरातील त्यांच्या भाड्याच्या घरी गेले असता ते रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. त्यांनी ही घटना तातडीने त्यांच्या कार्यालयातील वैद्यकीय अधिकाºयांना कळविली. सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.मृतदेहाच्या पायाखाली आढळली करवतघटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, सहायक अधीक्षक निलोत्पल, पोलीस निरीक्षक प्रविण वाडिले यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाºयांनी घटनास्थळ गाठले. डॉ. मोरे यांच्या मृतदेह दरवाजाच्या व्हरांड्यात होता तर त्यांच्या पायाखाली धारदार करवत आढळून आली. गळा चिरल्याच्या लांबलचक खुना व गळ्याजवळ चार इंचापेक्षा जास्त खोल भोसकले होते. प्राथमिकदृष्ट्या हा खूनच असल्याचे आढळून येत आहे, मात्र तरीही त्यांनी आत्महत्या केली असावी का? या शक्यतेनेही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.