शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर

By admin | Updated: September 29, 2016 06:34 IST

विधान परिषदेच्या पाच जागांसाठीची निवडणूक आता लांबणीवर पडली आहे. विद्यमान आमदारांची मुदत संपल्यानंतर निवडणूक होईल. त्यामुळे काही दिवस या जागा रिक्तदेखील राहतील.

मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठीची निवडणूक आता लांबणीवर पडली आहे. विद्यमान आमदारांची मुदत संपल्यानंतर निवडणूक होईल. त्यामुळे काही दिवस या जागा रिक्तदेखील राहतील.गृहराज्यमंत्री रणजित पाटील (अमरावती पदवीधर), सुधीर तांबे (नाशिक पदवीधर), विक्रम काळे (औरंगाबाद शिक्षक), ना. गो. गाणार (नागपूर शिक्षक), रामनाथ मोते (कोकण शिक्षक) या पाच विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या १२ डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे या जागांसाठी येत्या नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणे अपेक्षित होते. तथापि, १ आॅक्टोबरपासून या मतदारसंघांच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याचे काम निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार आहे. हे काम ७ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. त्यामुळे १२ डिसेंबरपूर्वी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नसल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकृत सूत्रांनी आज लोकमतला सांगितले. (विशेष प्रतिनिधी)नव्याने मतदार याद्याविद्यमान पाच आमदारांचा कार्यकाळ मात्र १२ डिसेंबरलाच संपेल. त्यानंतर निवडणुकीपर्यंत या जागा रिक्त राहतील. २०११ मधील मतदार याद्यांनुसार ही निवडणूक घेता येणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले. कारण दर निवडणुकीच्या आधी मतदार याद्या नव्याने तयार कराव्यात असा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे.२०१७मध्ये पाचही जागांसाठी निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी असेही स्पष्ट केले की, आम्ही या निवडणुकांचा कोणताही कार्यक्रम जाहीर केलेला नव्हता. आता मतदार याद्यांच्या पुनर्रचनेनंतर साधारणत: जानेवारी ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान पाचही जागांसाठी निवडणूक होईल, अशी शक्यता आहे. या निवडणुकीतील प्रमुख उमेदवारांच्या नावांची घोषणा आधीच करण्यात आली आहे. तथापि, आता मतदार याद्या तयार होताना आपापल्या मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी कशी होईल आणि आधीचे कसे गळणार नाहीत, याची दक्षता उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना घ्यावी लागणार आहे.