शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा : लक्षवेधी राखून ठेवण्याची सरकारवर नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 04:10 IST

ज्या कंपनीविरोधात गंभीर तक्रारी होत्या त्यांनाच लाळ्या खुरकत रोगावरची (एफएमडी) लस पुरवण्याचे कंत्राट दिले जात आहे. हरियाणात बोगस लस पुरवणा-या बायोवेट कंपनीला टक्केवारीचा हेतू ठेवून हे कंत्राट दिले गेले.

मुंबई : ज्या कंपनीविरोधात गंभीर तक्रारी होत्या त्यांनाच लाळ्या खुरकत रोगावरची (एफएमडी) लस पुरवण्याचे कंत्राट दिले जात आहे. हरियाणात बोगस लस पुरवणा-या बायोवेट कंपनीला टक्केवारीचा हेतू ठेवून हे कंत्राट दिले गेले. हा सगळा प्रकार मृताच्या टाळुवरचे लोणी खाण्यासारखा आहे. मुक्या जनावरांचा तुम्हाला तळतळाट लागेल, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पशुसंवर्धन विभागावर सडकून टीका केली. आक्रमक विरोधकांमुळे अखेर सरकारला विधानसभेत ही लक्षवेधी राखून ठेवावी लागली.लोकमतने हे प्रकरण उजेडात आणले होते. त्यावरुन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे हा विषय मांडला. मुक्या जनावरांना लस देण्यासाठी स्वत:ला हवी ती कंपनी जोपर्यंत पात्र होत नाही, तोपर्यंत म्हणजे तब्बल सातवेळा निविदा काढल्या गेल्याचा आरोप विखे व अजित पवार यांनी केला. या प्रकरणी डिसेंबरच्या अधिवेशनात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी हा विषय मांडला तेव्हा त्याची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, मात्र अद्याप चौकशी सुरू झाली नसल्याचे पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले. तसेच या निविदा प्रक्रियेत दिरंगाई आणि निष्काळजीपणा झाला आहे ; हेही राज्यमंत्र्यांनी मान्य केले. त्यानंतर विरोधक आणखी आक्रमक झाले.येत्या एक महिन्याच्या आत याची चौकशी मुख्य सचिवांमार्फत करू आणि दोषी अधिकाºयांवर कारवाई करु, असे राज्यमंत्री खोतकर सांगत असतानाच सत्ताधारी बाकावरुन एकनाथ खडसे यांनी सरकारला धारेवर धरले. सचिवांचे आदेश डावलून मनमानी करणाºया आयुक्तांचे नाव जाहीर करा, असेही खडसे म्हणाले. २ कोटी जनावरांचा हा प्रश्न आहे असे सांगून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पशुसंवर्धन आयुक्तांनी सचिवांचे आदेश मानलेले नाहीत. पशुसंवर्धन मंत्र्यांच्या सांगण्यावरुन हे काम झाल्याने याची चौकशी अधिकारी करु शकणार नाहीत. त्यासाठी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्र्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमा, अशी मागणी केली. तर विजय वडेट्टीवार यांनी इंडियन इमॉलॉजी कंपनीच्या तक्रारी नसताना त्या कंपनीबाबत खोट्या तक्रारी समोर आणल्या गेल्या असे सांगितले.राज्यमंत्री खोतकरांचे उत्तर ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत सदस्य नव्हते. सभागृहात प्रचंड गदारोळ सुरु झाला. शेवटी संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी हस्तक्षेप करुन मुख्यमंत्री दिल्लीत आहे ते आल्यानंतर यावर चर्चा करु, तोपर्यंत ही लक्षवेधी राखून ठेवावी, अशी सूचना अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना केली व अध्यक्षांनी लक्षवेधी राखून ठेवली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार