शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

‘ती’ खाती सोडून बोला !

By admin | Updated: December 1, 2014 03:14 IST

हिवाळी अधिवेशनापूर्वीच शिवसेनेशी युती होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठामपणे सांगत असले, तरी पाच विशिष्ट खाती आणि दोन वैधानिक पदे सोडून काय ते बोला, असा प्रस्ताव भाजपाने ठेवला आहे.

संदीप प्रधान, मुंबई हिवाळी अधिवेशनापूर्वीच शिवसेनेशी युती होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठामपणे सांगत असले, तरी पाच विशिष्ट खाती आणि दोन वैधानिक पदे सोडून काय ते बोला, असा प्रस्ताव भाजपाने ठेवला आहे. त्यामुळे सत्तेतील शिवसेनेच्या सहभागाचे गाडे पुन्हा अडले आहे.गृह, नगरविकास, गृहनिर्माण, महसूल, ग्रामविकास ही पाच खाती तसेच विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद ही दोन पदे सोडून बाकीचे काहीही मागा, असा प्रस्ताव भाजपाने शिवसेनेसमोर ठेवला आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या सत्तेतील सहभागात अडथळा निर्माण झाला आहे. शिवसेनेने हा प्रस्ताव मान्य केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक होऊन मंत्रिपदे व खाती यांचा निर्णय होऊ शकतो, असे सांगण्यात आले.विस्तारानंतर १० मंत्री शिवसेनेचे... पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, तेव्हा ही पाच खाती व दोन पदे सोडून उर्वरित खात्यांची मागणी करण्यास सांगितले. भाजपाच्या सरकारमधील मंत्र्यांची संख्या विस्तारानंतर ३२ असेल व त्यापैकी २२ मंत्री भाजपाचे तर १० मंत्री शिवसेनेचे असतील, असेही प्रधान-पाटील यांनी ठाकरे यांना सांगितले.सेनेची धार बोथट करण्याची खेळीहिवाळी अधिवेशनात शिवसेनेच्या विरोधाची धार बोथट करण्याकरिता चर्चेची नौटंकी भाजपाकडून सुरू करण्यात आलेली आहे. भाजपाच्या नेत्यांनी ‘मातोश्री’वर येऊन कोणती चर्चा केली ते स्वत:हून जाहीर करावे, असे मत शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केले.>शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याची मानसिकता स्वीकारली आहे. मंत्रिमंडळ सहभागाबाबत भाजपा सेनेची फसवणूक करीत आहे. १९९५च्या फॉर्म्युलानुसार सत्तेचे वाटप झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.>शिवसेनेतून मात्र प्रखर विरोधभाजपाने काय देतो यापेक्षा काय देणार नाही, असा प्रस्ताव सेनेसमोर ठेवल्याने भाजपाकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, असे शिवसेनेचे नेते सतत सांगत आहेत. भाजपाचा हा नकारात्मक प्रस्ताव मान्य करून उर्वरित खाती स्वीकारण्याची तयारी असेल तरच शिवसेनेचा सत्तेत सहभाग शक्य आहे. तथापि, हा प्रस्ताव स्वीकारण्यास सेनेतून प्रखर विरोध असल्याने शिवसेनेचा सत्ता सहभाग रखडला आहे.अधिवेशनापूर्वी युती - मुख्यमंत्रीसत्तेतील सहभागासंदर्भात शिवसेनेशी बोलणी सुरू आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनही धोरणात्मक चर्चा सुरू आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वीच सेनेशी युती होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जळगाव येथे स्पष्ट केले. > महत्त्वाची सर्व पदे आधीच भरलीविधानसभा अध्यक्षपद यापूर्वीच भरलेले आहे. त्यामुळे ते पद देण्याचा प्रश्न येत नाही. शिवाय उपमुख्यमंत्रिपद निर्माण न करण्याचे पक्षाचे धोरण असल्याने ते पदही देता येणार नाही, असे भाजपाने स्पष्ट केले आहे. राज्यांत गृह खाते मुख्यमंत्र्यांकडे असावे हा पक्षाचा आग्रह असल्याने हे खाते देता येणार नाही. नगरविकास-गृहनिर्माण ही खाती मुख्यमंत्र्यांकडेच असणार, ती देणे शक्य नाही. महसूल खाते एकनाथ खडसे यांच्याकडे असल्याने त्याचाही विचार सोडून द्या. ग्रामविकास खाते भाजपाकडेच राहणार आहे, असे भाजपाने सेनेला बजावले.