शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

गळती, चोरी, पाइपफुटीचा फटका

By admin | Updated: April 5, 2017 03:27 IST

वारंवार फुटणारी पाईपलाईन, मोठ्या प्रमाणावर होत असलेली गळती आणि चोरीमुळे वसई विरार परिसरात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

शशी करपे,वसई- वारंवार फुटणारी पाईपलाईन, मोठ्या प्रमाणावर होत असलेली गळती आणि चोरीमुळे वसई विरार परिसरात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या पाणी टंचाईचा फायदा टँकर लॉबीने उचलला असून टँकरचे दर वधारल्याने लोकांचे हाल होऊ लागले आहेत.सध्या वसई विरार शहराला सूर्या, उसगाव, पेल्हार आणि पापडखिंड धरणातून दररोज १३१ एमएलडी पाणी पुरवठा होतो. वसईची लोकसंख्या पाहता दररोज आणखी ९० एमएलडीची पाण्याची गरज आहे. हा तुटवडा लक्षात घेऊन गेल्या अनेक वर्षापासून महापालिका एक दिवस आड पाणी पुरवठा करून शहराची गरज भागवण्याचा प्रयत्न करीत आहे. सूर्याची वाढीव १०० एमएलडी पाणी पुरवठा योजना अंतिम टप्यात आहे. मात्र, त्यातून प्रत्यक्षात पाणी पुरवठा होण्यासाठी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. पण, सध्या पाणी टंचाईने पुन्हा डोके वर काढले आहे. विरार येथील पापडखिंड धरण आटल्याने तेथून होणारा १ एमएलडी पाणी पुरवठा बंद झाला आहे. दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपासून सूर्या पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन वारंवार फुटू लागली आहे. त्यातच लोडशेडींगमुळे पंपहाऊसचा वीज पुरवठा खंडीत होणे, दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद करणे असे प्रकार होत आहेत. १५ मार्चला तीन दिवस दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. पण, पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी पाच दिवस लागले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी सूर्याची पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा तीन दिवस ठप्प झाला होता. महत्वाची बाब म्हणजे सूर्या पाणी पुरवठा लाईनवर अनेक ठिकाणी लिकेज असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुख्य पाईपलाईनवरून ज्या गावांना नळजोडण्या देण्यात आल्या आहेत तेथून टँकरचालक पाणी चोरी करीत आहेत. सध्या वसई विरार परिसरात पाणी टंचाईचे जोरदार चटके जाणवू लागले आहेत. त्याचा फायदा उचलून टँकर लॉबीने आपले दर वाढवून लोकांची अडवणूक सुरु केली आहे. संपूर्ण शहरात सध्या साडे सहाशेहून अधिक टँकर धावू लागले आहेत. त्यापैकी एकट्या नालासोपारा परिसरात साडेतीनशेच्या आसपास टँकर आहेत. पाणी टंचाईचे निमित्त पुढे करीत टँकरचे दर दीड हजार रुपयांपर्यंत जाऊन पोचले आहेत. >जुनाट, गळके, अनफिट टँकरमुळे अपघात वाढले : विरारच्या आरटीओ कार्यालयात फक्त २२५ टँकरची नोंद आहे. काही टँकरची नोंद ठाणे आरटीओ कार्यालयात आहे. ्त्यामुळे शहरात किमान तीनशे टँकर बेकायदेशीरपणे धंदा करीत आहेत. मुंबईत आठ वर्षांपेक्षा जुन्या ट्रकवर बंदी आहे. याच ट्रकवर फेरबदल करून टँकरमध्ये बेकायदेशीर रुपांतर करून वापर केला जात आहे. अनेक टँकर जुनाट, गळके, फिटनेस नसलेले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अधिक फेऱ्यांच्या नादापायी चालक सुसाट टँकर चालवून महिन्याला किमान एकाच बळी घेत आहेत. >पाईपलाईन फुटी गुन्हे दाखल कराकाही वर्षांपूर्वीच नव्याने टाकण्यात आलेली पाईपलाईन फुटत असल्याने पाईपलाईनची गुणवत्ता तपासून अधिकारी आणि ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजन नाईक यांनी केली आहे. फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्याच्या कालावधीत तात्पुरता पाणी पुरवठा करण्याची कोणतीच योजना महापालिकेकडे नाही. त्यामुळे संपूर्ण वर्षाची एकरकमी पाणी पट्टी भरूनही लोकांना टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. या संधीचा फायदा घेऊन टँकर लॉबी जादा दर आकारीत असल्याची तक्रार नाईक यांनी केली आहे.