शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान पॅकेज वाटून खाणारे कोडगे नेते - मुख्यमंत्री

By admin | Updated: April 27, 2017 19:37 IST

विरोधी पक्षातील आमदार व खासदारांनी सत्तेत असताना पंतप्रधान पॅकेजचे पैसे वाटून खाल्ले. त्यामुळे शेतक-यांच्या आजच्या अवस्थेला तेच जबाबदार असतानाही निर्लजासारखे

ऑनलाइन लोकमत
पिंपरी -चिंचवड, दि. 27 - विरोधी पक्षातील आमदार व खासदारांनी सत्तेत असताना पंतप्रधान पॅकेजचे पैसे वाटून खाल्ले. त्यामुळे शेतक-यांच्या आजच्या अवस्थेला तेच जबाबदार असतानाही निर्लजासारखे संघर्ष यात्रा काढत आहेत. ऐवढे कोडगे नेते कसे काय असू शकतात, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, या संघर्ष यात्रेला उत्तर म्हणून भाजप सरकारकडून राबविण्यात येणा-या उपायोजनांची माहिती थेट शेतक-यांर्पयत पोहचविण्यासाठी संवाद यात्रा काढण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.  
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीचा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात गुरुवारी समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील व राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू आदी व्यासपीठांवर उपस्थित होते. 
मुख्यमंत्री यांनी संघर्ष यात्रा काढणा-या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला.  संघर्ष यात्रेला नाव दिल्यानं संघर्ष होत नाही. मनापासून संघर्ष करावा लागतो. शेतक-यांच्या आजच्या स्थितीला तेच जबाबदार आहेत. हे जनतेला माहिती असल्याने त्यांच्या संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे केवळ मोजके कार्यकर्ते घेऊन संघर्ष सुरू आहे. केवळ एअर कंडीशनर गाडीतून फिरून संघर्षयात्रा होत नाही, गोपीनाथ मुंडेंच्या संघर्षयात्रेने परिवर्तन घडवलं होतं. विरोधकांच्या संघर्ष यात्रेला आमच्या संवाद यात्रेतून उत्तर देण्यात येईल. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून झालेली कामे, शासनाकडून करण्यात येणा-या उपायोजनांची माहिती थेट शेतक-यांच्या शेतीच्या बांधावर व शिवारात जाऊन संवाद साधण्यात येणार आहे. कोणीही एसी बसने प्रवास करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी आमदारांना आवाहन केले.  
भाजपा सरकारने जीएसटीसारखा एकच कर पध्दती देशभर सुरू केली आहे. हा कर जास्तीत जास्त 28 टक्के असणार आहे. त्यामध्ये भ्रष्टाचार करण्यास कोणताही वाव नाही. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीम आधार अॅप सुरू केले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना केवळ अंगठय़ाच्या आधारे बँकेचे व विविध व्यवहार पारदर्शकपण करता येणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.  
 
तर व्यापा-यांवर फौजदारी गुन्हा...
सद्या तुरीवरून आंदोलन सुरू आहे. मात्र, भाजपा सरकारने देशातील 11 लाख टन खरेदी, एकट्या महाराष्ट्रात 4 लाख टन तुरीची खरेदी केली आहे. आमच्यावर टीका करणारांनी सत्तेत असताना 13 लाख टन तुरीचे उत्पादन असताना केवळ 20 हजार टन तूर खरेदी करून शेतक-यांना रस्त्यावर सोडलं होते. परंतु, आम्ही 22 एप्रिलर्पयत दोनवेळा मुदतवाढ देऊन शेतक-यांच्या तुरीचा शेवटचा दाणाही खरेदी केला आहे. मात्र, शेतक-यांच्या नावानं व्यापारीकरण खपवून घेतलं जाणार नाही. शेतक-यांच्या तुरीचा बोनस व्यापा-यांनी लाटण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला. 
 
जनतेपासून तुटल्याने बुरुज ढासळले...
भाजपा सरकारने विकास व विश्वासाचे राजकारण केले. त्यामुळे भाजपाला नागपूरमध्ये सत्तेतून सत्ता आणि लातूरमध्ये शून्यातून सत्ता मिळाली. त्यामुळे भाजपा आता महाराष्ट्रव्यापी पक्ष झाला असून, विरोधी पक्ष हे प्रदेशापुरते उरले आहेत. सत्तेत आल्यानंतर मालक समजू लागल्याने विरोधी पक्षाचे नेते जनतेपासून तुटले. त्यामुळे अनेक नेत्यांचे बुरूज ढासळले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये पवारांचा, कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा, सोलापूरात विजयसिंह मोहिते-पाटील, इस्लामपूरला जयंत पाटील आणि सांगलीत पंतगराव कदम यांचे बुरूज ढासळले, तर काहींचे उद्धवस्त झाले. जे अहंकारी झाले, त्यांचा अहंकार जनतेने संपविला आहे. विरोधकांच्या मोगलाईला कंटाळून आपल्याला जनतेने सत्ता दिली आहे. त्यामुळे विजयांचा उन्माद व अहंकार करू नका, असा सल्ला मुख्यमंत्री यांनी दिला. तसेच, भाजपाचे सर्व आमदार, खासदार व जिल्हा परिषद अध्यक्षांनी पारदर्शक कारभार करण्याचे आवाहन केले.