शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वकील महिलेचे अपहरण करून तीन महिन्यांपासून अत्याचार, ११ आरोपींमध्ये पत्रकार व वकिलाचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 22:50 IST

सरकारी वकील होण्यासाठी असलेल्या स्पर्धेत एका महिला वकीलाची सुपारी देवून तिचे अपहरण करण्यात आले. पत्रकार व वकील हे या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असून या संदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गोंदिया : सरकारी वकील होण्यासाठी असलेल्या स्पर्धेत एका महिला वकीलाची सुपारी देवून तिचे अपहरण करण्यात आले. पत्रकार व वकील हे या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असून या संदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गोंदिया शहराच्या बसंतनगर बालाघाट रोड रस्त्यावरील एका ३६ वर्षाच्या महिला वकीलाने  सरकारी वकील होण्यासाठी अर्ज दाखल केला होता. तर त्यांच्या स्पर्धेत अ‍ॅड. तोलानी हे सुद्धा होते. तोलानी पेक्षा त्या कामाकाजात वरिष्ठ असल्यामुळे त्यांची निवड निश्चित होती. हे पाहून अ‍ॅड.तोलानी व पिडित वकील महिलेसोबत वैन्यमस्य असलेले पत्रकार इंद्रकुमार राही या दोघांनी कट रचला. त्यांच्या अपहरणाची सुपारी जुल्फीकार जब्बार गणीऊर्फ छोटू याला दिली. त्याने आपल्या साथीदारांना घेवून ७ जून २०१७ च्या सकाळी १०.३० वाजता पिडित महिला न्यायालयात जात असताना न्यायालयाच्या बाहेरुनच दिवसाढवळ्या त्यांना उचलले. या प्रकरणात जुल्फीकार जब्बार गणी, प्रकाश ताराचंद तोलाणी  (३४), इंद्रकुमार एच. राही (५५), बाबा जब्बार गणी (४०), गोलू गणी (३०), आशिष मिश्रा (४०), अन्नु करियार (३५), अक्की अग्रहरी (३०) व इतर तीन अशा ११ जणांविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात रविवारी (दि.२४) भादंवि कलम ३७६ (२) (एन) ३६३, ३६४ अ, ३४२, ३४, १२० ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे ७ जून पासून १८ सप्टेंबरपर्यंत तिला अज्ञात स्थळी डांबून ठेवले.आरोपी जुल्फीकार जब्बार गणी याने त्या वकील महिलेवर बळजबरी केली. तसेच सर्व आरोपींनी ठार मारण्याची धमकी दिली. परंतु आरोपींची नजर चोरुन सदर महिला १८ सप्टेंबर रोजी पळून गोंदियात आली. या संदर्भात गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र आरोपीला अटक झाली नव्हती. तपासुन पोलीस निरीक्षक मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक विवेक नार्वेकर करीत आहेत.

टॅग्स :MolestationविनयभंगRapeबलात्कार