शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

लवासा निघाला दिवाळखोरीत; फ्लॅटधारकांना पैसे मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 02:16 IST

बहुचर्चित लवासा प्रकल्प विविध कारणांनी ठप्प पडल्याने दिवाळखोरीत निघाला आहे. त्यामुळे दिवाळखोरी व नादारी संहितेच्या (आयबीसी) नवीन नियमांनुसार फ्लॅटधारकांना त्यांचे पैसे परत मिळू शकतील.

- चिन्मय काळेमुंबई : बहुचर्चित लवासा प्रकल्प विविध कारणांनी ठप्प पडल्याने दिवाळखोरीत निघाला आहे. त्यामुळे दिवाळखोरी व नादारी संहितेच्या (आयबीसी) नवीन नियमांनुसार फ्लॅटधारकांना त्यांचे पैसे परत मिळू शकतील. या नवीन नियमातील हे पहिलेच मोठे प्रकरण आहे.हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीची (एचसीसी) सर्वाधिक (६८.७ टक्के) हिस्सेदारी असलेल्या लवासा कॉर्पोरेशन लिमिटेडने पुण्याजवळ निसर्गाच्या सान्निधन्यात सुमारे दिड लाख कोटी रुपयांचा ‘लवासा सिटी’ हा अत्याधुनिक प्रकल्प उभारण्यास सुरूवात केली होती. २२०० रहिवासी इमारती, हॉटेल्स, व्हिला आदींचा त्यात समावेश होता. पण पर्यावरण विभागाने परवानगी नाकारल्याने त्यामध्ये बराच अवधी वाया गेला. यादरम्यान प्रकल्पासाठी आर्थिक साहाय्य मिळणेही बंद झाले. रिझर्व्ह बँकेने १२ फेब्रुवारी २०१८ ला कर्जे थकित असलेल्या कंपन्यांच्या पुनर्बांधणीसंबंधी नवीन नियम तयार केला. या नियमांतर्गतही कंपनीने पुनर्बांधणीचा आराखडा बांधला. तो कंपनीला वित्त साहाय्य करणाऱ्यांना देण्यात आला. पण त्यांच्याकडून आराखडा फेटाळण्यात आला. त्यामुळेच आता आयबीसीच्या नवीन नियमांनुसार हे प्रकरण तडीस नेण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.आयबीसीअंतर्गत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लवासा कॉर्पोरेशन लिमिटेडनेच राष्टÑीय कंपनी लवादाकडे याचिका दाखल केली होती. ती याचिका लवादाने स्वीकारली असून आता प्रवर्तकांच्या समितीने कंपनीचा ताबा घेतला आहे. पुढील २७० दिवसात दिवाळखोरीची प्रक्रिया पूर्ण होईल. प्रक्रियेअंती कंपनीच्या मूळ गुंतवणूदारांची हिस्सेदारी कमी होईल. पण हा निर्णय प्रकल्पातनिवासासाठी अथवा अन्य कारणाने गुंतवणूक केलेल्या किरकोळ ग्राहकांच्यादृष्टीने अत्यंत सकारात्मक असेल, असे एचसीसी लिमिटेडचे संचालक व समूह सीईओ अर्जून धवन यांनी मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या नोटीशीत नमूद केले आहे.फ्लॅटधारकांचा असा होईल फायदा‘लवासा सिटी’ साठी लवासा कॉर्पोरेशनने विविध बँकांकडून कर्जे व अन्य संस्थांकडून वित्त साहाय्य घेतले होते. आता कंपनी कायदा लवादामार्फत या कंपनीची अन्य कंपनीकडून खरेदी होईल. त्यामध्ये नवीन कंपनी सर्व कर्जदारांचा पैसा परत करेलच. पण आयबीसीच्या नवीन नियमांतर्गत लवासा रिअल कंपनी असल्याने देणींमध्ये ग्राहकांचा हिस्सासुद्धा असेल.यामुळे या प्रक्रियेनंतर ग्राहकाने फ्लॅटपोटी लवासा कॉर्पोरेशनकडे भरलेली रक्कम त्याला परत मिळू शकेल.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र