शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

लातूर : शहीद जवान रामनाथ हाके यांचे पार्थिव दाखल, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाला होता मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 11:04 IST

रामनाथ यांचा नुकताच विवाह ठरला होता. लहानपनासूनच रामनाथ हाके यांना सैन्यदलात सामील होण्याची इच्छा होती.  दोनच वर्षांपूर्वी ते सैन्यात भरती झाले होते.

ठळक मुद्देऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ब्रेन हॅमरेज होऊन उपचारादरम्यान मृत्यू पावलेले शहीद रामनाथ माधव हाके लहानपनासूनच रामनाथ हाके यांना सैन्यदलात सामील होण्याची इच्छा होती.  दोनच वर्षांपूर्वी ते सैन्यात भरती झाले होते. रामनाथ यांचा नुकताच विवाह ठरला होता.

लातूर, दि. 27 - ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ब्रेन हॅमरेज होऊन उपचारादरम्यान मृत्यू पावलेले शहीद रामनाथ माधव हाके (वय 24 वर्षे) यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी मणेरवाडी (ता. चाकूर) येथे दाखल झाले आहे. आज येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हजारो नागरिकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली आहे.

लहानपनासूनच रामनाथ हाके यांना सैन्यदलात सामील होण्याची इच्छा होती.  दोनच वर्षांपूर्वी ते सैन्यात भरती झाले होते. रामनाथ यांचा नुकताच विवाह ठरला होता.  सध्या ते  पश्‍चिम बंगालमधील  सिलीगुडी येथे कार्यरत होते. सिक्‍कीम येथे जमिनीपासून 18 हजार फूट उंचीवरील टेकडीवर कर्तव्य बजावत असताना 6 ऑगस्ट रोजी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता. त्यानंतर त्यांना तातडीने बागडोरा (प. बंगाल)  येथील सैनिकी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (25 ऑगस्ट) मध्यरात्री दोनच्या सुमारास ते शहीद झाले. हाके यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक विवाहित बहीण असा परिवार आहे. 

रामनाथ यांचे पार्थिव शनिवारी दुपारी बागडोगरा येथून सैन्य दलाच्या विमानाने दिल्ली येथे आणले त्यानंतर आज रविवारी त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी मणेरवाडी येथे आणले आहे. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.