शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

Lata Mangeshkar: लता मंगेशकरांचे आजोळ महाराष्ट्रातील या जिल्ह्यात; घर पडलेय, पण पिंपळाचे झाड आजही आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 16:37 IST

थाळनेर गावात लता दीदींच्या आई माई (शेवंती) मंगेशकर यांचे वडील हरिदास लाड राहायचे. माई मंगेशकर यांनी थाळनेरच्या शाळेत शिक्षणही घेतलं आहे.

जळगाव- भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. त्यांच्या जाण्यानं संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. लता मंगेशकर आणि धुळे जिल्ह्याचा एक ऋणानुबंध राहिला आहे. ‌धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील थाळनेर हे गाव लता दीदींचं आजोळ आहे. याठिकाणी त्यांचे आजोबा हरिदास रामदास लाड राहत होते. आजही गावात त्यांच्या घराच्या खाणाखुणा नजरेस पडतात. लता दीदींच्या निधनाचं वृत्त कळताच थाळनेर गावावर एकच शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

थाळनेर गावात लता दीदींच्या आई माई (शेवंती) मंगेशकर यांचे वडील हरिदास लाड राहायचे. माई मंगेशकर यांनी थाळनेरच्या शाळेत शिक्षणही घेतलं आहे. हरिदास लाड हे संगीत क्षेत्रात काम करायचे. त्यांचं थाळनेरात चार खोल्यांचं घर होतं. सुमारे 70 ते 80 वर्षांपूर्वी त्यांनी हे घर थाळनेरातील परभत संपत कोळींना विकलं होतं. सध्या या घराची संपूर्ण पडझड झालीये. लता दीदींच्या कुटुंबातील कोणीही याठिकाणी राहत नाही.

आईच्या आठवणीनं हृदयनाथ मंगेशकर यांनी दिली होती थाळनेरला भेट-

लता दीदींचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सुमारे 18 ते 20 वर्षांपूर्वी थाळनेरला भेट दिली होती. आपल्या आजोळला भेट देण्यामागे त्यांचा खास हेतू होता. आई माई मंगेशकर यांनी घरासमोर लावलेले कडुलिंब आणि पिंपळ या झाडांना पाहण्यासाठी ते थाळनेरला आले होते. याठिकाणी त्यांनी थाळनेरचे रमणभाई शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर माई मंगेशकरांनी शिक्षण घेतलेल्या शाळेलाही भेट दिली होती. थाळनेर गावातील स्वयंभू गणपती आणि नदीतील महादेवाचंही त्यांनी दर्शन घेतलं होतं. त्यानंतर मंगेशकर कुटुंबीयांपैकी कुणीही याठिकाणी आलेलं नाही.

थाळनेरकरांनी जागवल्या आठवणी-

थाळनेर गावातील माजी उपसरपंच एकनाथसिंह जमादार, मोरेश्वर भावे, चेतन भारती, के. सी. पाटील, वसंतभाई गुजराथी यांनी लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला. 24 एप्रिल 2007 रोजी पुणे येथे आयोजित एका कार्यक्रमाला लतादीदींनी भेट दिली होती. या कार्यक्रमासाठी थाळनेर गावातील लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं  कार्यक्रम आटोपल्यानंतर लतादीदींनी थाळनेरकरांशी खास संवाद साधला होता, अशी आठवणही या सर्वांनी यावेळी सांगितली.

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकर