शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जयप्रभाच्या मिळकतीवर बांधकाम करण्यास लता मंगेशकर यांना मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 13:36 IST

कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओच्या मिळकतींवर कोणतेही बांधकाम करण्यास गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मुभा आहे, त्यामुळे याविरोधात अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि ९ चित्रपट व्यावसायिकांनी दाखल केलेला दावा कोल्हापूर न्यायालयाने फेटाळला आहे.

ठळक मुद्देजयप्रभाच्या मिळकतीवर बांधकाम करण्यास लता मंगेशकर यांना मुभान्यायालयाचा निर्णय : चित्रपट महामंडळाचा दावा फेटाळला

कोल्हापूर : येथील जयप्रभा स्टुडिओच्या मिळकतींवर कोणतेही बांधकाम करण्यास गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मुभा आहे, त्यामुळे याविरोधात अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि ९ चित्रपट व्यावसायिकांनी दाखल केलेला दावा कोल्हापूरन्यायालयाने फेटाळला आहे.कोल्हापूर महानगरपालिका आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याविरुध्द अखिल भारतीय चित्रपट महामंडळासह ९ चित्रपट व्यावसायिकांनी दाखल केलेल्या दाव्याची सोमवारी सुनावणी झाली. त्यात महामंडळाची आणि लतादीदींची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.

जयपभ्रा स्टुडिओची मिळकत महाराष्ट्र शासन आणि कोल्हापूर महानगरपालिकेने संपादन करुन चित्रपट सृष्टीसाठी जतन करावी आणि तेथील इमारती व्यापारी कारणासाठी वापरु नये, प्राचीन इमारतीचे नुकसान करु नये यासाठी लता मंगेशकर यांना कायमस्वरुपी मनाई करावी यासाठी कोल्हापूरच्या दिवाणी न्यायालयात महामंडळाच्या वतीने दावा दाखल करण्यात आला होता.चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांनी कोल्हापुरात उभारल्या जयप्रभा स्टुडिओची जागा लता मंगेशकर यांनी खरेदी केली होती. लता मंगेशकर यांनी सन २०१४ मध्ये खासगी विकासकास ही जागा देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या विरोधात कोल्हापूरकरांनी मोठे जनआंदोलन उभारले. त्यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने हा स्टुडिओ शासनाने ताब्यात घेवून त्याचा विकास करावा, अशी मागणी करणारी याचिका येथील न्यायालयात दाखल केली होती.

जयप्रभा स्टुडिओची मिळकत ही लता मंगेशकर यांनी १९५९ मध्ये कोर्ट लिलावामध्ये खरेदी केलेली वैयक्तिक मिळकत आहे.  या जागेवर बागबगीचा व सांस्कृतिक केंद्र असावे या संदर्भात २००६ मध्ये आरक्षण आले होते. मात्र दोन वर्षांनी म्हणजेच २००८ मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने दुसऱ्या विकास आराखड्यात या मिळकतीवर कोणतेही सार्वजनिक आरक्षण ठेवलेले नाही, हे आरक्षणही उठविल्यामुळे या जागेवर अन्य कोणत्याही व्यक्ती संस्था किंवा शासनाला आपला हक्क सांगता येणार नाही.  तसेच या मिळकतीत लता मंगेशकर यांनी कोणतीही पाडापाडी केलेली नाही किंवा विक्री करण्याचा निर्णय घेतलेला नाही, असा युक्तिवाद मंगेशकर यांचे वकील महादेवराव आडगुळे यांनी केला.१९४७ मध्ये भालजी पेंढारकर यांच्या पत्नीच्या नावे करताना झालेल्या खरेदीपत्रात त्यावेळच्या संस्थानने ही मिळकत चित्रपट व्यवसायासाठीच वापरावी, अशी घातलेली अट १९८२ मध्ये महाराष्ट्र शासनाने रद्द केलेली आहे. त्यामुळे कोणत्याही कारणासाठी या मिळकतीचा वापर करण्याचा अधिकार लता मंगेशकर यांना आहे.

ही मिळकत २0१२ मध्ये वारसास्थळाच्या वर्ग तीनच्या यादीत असले तरी आयुक्त आणि वारसा स्थळ समितीच्या परवानगीनेच तेथे पाडापाडी, दुरुस्ती, विकास व वाणिज्य वापरास मुभा आहे. चित्रपट महामंडळातर्फे यशवंत भालकर आणि लता मंगेशकर यांच्या वतीने वटमुखत्यार विलास बाबुराव यादव यांच्या साक्षी यापूर्वी झालेल्या आहेत. सोमवारी झालेल्या सुनावणीत वकीलांच्या युक्तिवादानंतर कोल्हापूरचे जॉर्इंट सिव्हिल जज्ज ए. ए. भोसले यांनी हा दावा खर्चासह फेटाळला आहे.

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरkolhapurकोल्हापूरCourtन्यायालय