शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टिका, स्पष्टच बोलले
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
5
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
6
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
7
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
8
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
9
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
10
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
11
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
12
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
13
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
14
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
15
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
16
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
17
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
18
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
19
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
20
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...

लासलगाव - १९८५ नंतर प्रथमच गोणीसह कांदा लिलाव

By admin | Updated: July 26, 2016 16:56 IST

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १९८५ नंतर व्यापारीवर्गाच्या मागणीमुळे प्रथमच गोणीसह कांदा लिलाव मंगळवार पासून सुरु झाला आहे

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. २६  :- लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १९८५ नंतर व्यापारीवर्गाच्या मागणीमुळे प्रथमच गोणीसह कांदा लिलाव मंगळवार पासून सुरु झाला आहे . यावेळी बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्या हस्ते कांदा गोण्यांचे पूजन करण्यात आले .यावेळी सदस्य सचिन ब्रम्हेचा ,रमेश पालवे, सचिव बी.वाय.होळकर , व्यापारी ओमप्रकाश राका, नितीन जैन ,रमेश शिंदे , वाल्मीकराव जाधव , राठी ,राहुल बरडिया ,संतोष माठा ,उपस्थित होते . बाजार समितीत शेतक-यांनी वाहनातून कांदा १७८६ गोणीत आणला होता .त्या कांद्याला जास्तीजास्त ९५२ रुपये ,सरासरी ८४४ रुपये तर कमीतकमी ४०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला .

रविवारी मनमाड येथे झालेल्या बैठकीत व्यापा-यांनी शेतक-यांकडून अडत न घेता इतर जिल्ह्यातून कांदा गोणीत लिलावासाठी येत असल्याने नाशिक जिल्ह्यातून हि शेतक-यांनी कांदा हा गोणीत आणावा हा निर्णय घेतल्यानंतर मंगलवारी लासलगाव कृषी उत्पन्न समितीत गोणीत कांदा आणत १७ दिवसानंतर लिलाव पूर्ववत सुरु झाला आहे .

दोन आठवड्यांपासून बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला होता . दरम्यान कांदा व्यापा-यांनी सुरु केलेला संप मागे घेतल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी गोणी पद्धतीने कांदा लिलाव सुरु करण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतल्याने शेतक-यांची घोर निराशा झाली .यामुळे शेतक-यांचा खर्च अडीचपट वाढणार आहे .पूर्वीच्याच लिलाव पद्धतीने व्यापा-यांनी कांदा लिलाव सुरु करावा अशी मागणी बाजार समितीत शेतकरी करताना दिसत होते .

यापुढे अडत हि कांदा खरेदीदारांकडून वसूल केली जाणार असली तरी व्यापा-यांनी गोनी पद्धतीने कांदा लिलाव करण्याचा निर्णय घेतल्याने कांदा निवड करून गोणीत भरून आणावा लागणार असल्याने मजुरी व नवीन कांदा बारदान गोनी विकत घ्यावी लागणार आहे यामुळे शेतक-यांना क्विंटलमागे ९० ते १०० रुपये अतिरिक्त खर्च येणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे .व्यापा-यांना होणार हा फायदा ......प्रतवारी केलेला कांदा मिळणार . मजूरवर्ग लागणार नाही . कांद्यासाठी गोण्या लागणार नाही . बाजार समितीतून कांद्याचा लिलाव झाल्याबरोबर गाडी भरून पाठविल्यास होणार आर्थिक फायदा .हे होणार शेतकरीवर्गाचे नुकसान .......कांदा प्रतवारीसाठी मजुरी वर खर्च कांद्यासाठी गोणी वर खर्च. शासनाने हस्तक्षेप करत गोणी पद्धत बंद करावी ........

जयदत्त होळकर शेतक-यांनी कांदा गोणीत भरून आणल्यास त्याचा लिलाव करण्यात येईल व शेतक-यांकडून अडत घेतली जाणार नाही अशी व्यापा-यांनी भूमिका घेतली असल्याने यात शासनाने हस्तक्षेप करत पूर्वीप्रमाणे खुल्या पद्धतीने लिलाव सुरु करावे .