शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रायगड-रत्नागिरीच्या समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात स्टिंगरे मासे, हवामान बदलांचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 16:31 IST

रायगड जिल्ह्यातील नवगाव, वरसोली, सासवणे, मांडवा, सारळ तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली समुद्र किनारी मोठय़ा प्रमाणात स्टिंगरे अर्थात पाकट आणि अन्य काही प्रकारचे मासे शनिवारी-रविवारी अचानक येवून थडकल्याने किनारी भागातील कोळी बांधवांमध्ये मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

 - जयंत धुळपअलिबाग - रायगड जिल्ह्यातील नवगाव, वरसोली, सासवणे, मांडवा, सारळ तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली समुद्र किनारी मोठय़ा प्रमाणात स्टिंगरे अर्थात पाकट आणि अन्य काही प्रकारचे मासे शनिवारी-रविवारी अचानक येवून थडकल्याने किनारी भागातील कोळी बांधवांमध्ये मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अलिबाग तालुक्यांतील नवगाव, वरसोली, सासवणे, मांडवा, सारळ या समुद्र किना:यांवर हे मासे आढळून आल्याच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी मुंबईतील सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ुटच्या सागरी तज्ज्ञांच्या पथकाने नवगाव येथील समुद्र किना-यांची पाहणी केली. समुद्र तळाला होणारे भौतिक बदल त्याच बरोबर हवामानातील बदल यामुळे हे मासे किना-याकडे आले आहेत. मान्सून समाप्तीच्या वेळी अशा प्रकारे हवामानातील बदल खोल समुद्रात होवू शकता. सागरी प्रदूषणामूळे हे घडलेले नसल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. माशांचे नमुने घेण्यात आले असून, प्रय़ोगशाळेतील तपासणी अंती अंतिम निष्कर्ष सांगता येईल अशी माहिती  सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ुटचे संचालक तथा सागरी तज्ज्ञ डॉ.वीरेंद्र सिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.

    रायगड जिल्ह्यातील या किना-यांवर शनिवारी व रविवारी काही ठिकाणी हे मासे दिसून आल्यावर, त्या बाबतची खातरजमा करण्याकरिता सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ुटला कळविण्यात आले होते. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ुटचे संचालक तथा सागरी तज्ज्ञ डॉ.विरेंद्र सिंग व डॉ.रामकुमार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अलिबाग क्षेत्रीय अधिकारी एम.बी.वाघमारे यांनी नवगांव येथे सत्वर भेट देवून हि पहाणी केली. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ुटचा अधिकृत अहवाल येत्या काही दिवसात प्राप्त होईल, अशी माहिती मत्स्य विभागाचे उपायुक्त अविनाश नाखवा यांनी दिली.

    २० ते २५ किलोचा एक स्टींगरे ५०० ते ७०० रूपयांर्पयत विकला जात होता. तर कोळंबी ४० ते ५० रूपये किलो प्रमाणो विकली जात होती. त्यामुळे स्थानिक कोळी बांधव विक्रीमूळे तर खवय्ये मासे खाण्यास मिळाल्याने सुखावले होते.