शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीतील असनिये येथे डोंगर खचला; घारपी गावाचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 18:37 IST

गेले चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने ओटवणे पचक्रोंशीत हाहाकार माजवला असून, असनियेतील मोठा डोंगरच खाली आला.

सावंतवाडी - गेले चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने ओटवणे पचक्रोंशीत हाहाकार माजवला असून, असनियेतील मोठा डोंगरच खालती आला असून, यामुळे घारपीकडचा संपर्क तुटला आहे. तर या डोंगराच्या खाली असलेली पाच घरे थोडक्यात बचावली असून, माती मात्र त्यांच्या घरात घुसली आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली असून, डोंगर खालती आला त्यावेळी मोठा आवाज झाल्याचे गावक-यांनी सांगितले.

सावंतवाडी तालुक्यात गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणात पाउस कोसळत आहे. या पावसामुळे ओटवणे पंचक्रोशीत सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, नदी नाले तुडूंब भरून वाहात आहेत. त्यातच असनिये दाभील कडे जाणारा रस्ता खचून मोठे नुकसान झाले आहे.अनेक गावामध्ये दुचाकी वगळता मोठी वाहने जात नाहीत.अशातच असनिये घारपीला जोडणाºया रस्त्याला लागून एक मोठा डोंगर आहे. या डोंगराची माती मंगळवारपासून खालती येत होती. गावकरी  परिस्थीतीवर लक्ष ठेवून असतनाच बुधवारी रात्रीच्या सुमारास तर पूर्णच डोंगर खाली आला.डोगरच खाली आल्याने असनिये घारपी रस्ता पूर्णपणे गाडला गेला असून, विद्युत पोलही या डोंगरातील मातीच्या खाली अडकून पडले आहेत. तसेच तब्बल शंभर ते दिडशे काजूंची झाडे नारळ मोठ मोठी झाडेही डोंगराच्या माती खाली आहेत. या डोंगराच्या खाली पाच घरे असून, ही घरे मात्र सध्यातरी सुरक्षित आहेत. पण त्यांच्या अंगणात पाण्याबरोबर मातीही आली आहे. त्यामुळे सर्वत्र चिखल झाला आहे. असनियेतून घारपीला जाण्यासाठी रस्ता आता पूर्णता गाडला गेल्याने घारपी गाव संर्पकहिन झाला आहे. घटनेनंतर प्रशासनाचे अधिकारी गुरूवारी सायंकाळी गावात पोचले असून, यात नायब तहसलिदार सुरेश पवार यांच्यासह अधिकाºयांचा समावेश आहे. त्यांनी घटनेची पाहणी केली आहे.असनिये गावात गेले पाच ते सहा दिवस विज नाही. तर घारपी गाव सर्व दृष्ट्या आता अडचणीत सापडला असून, गावात संपर्क करण्यासाठी कोणतेच साधन नाही. जर त्यान्ाां घारपीतून असनियेत यायचे झाले तर पायवाट शोधत यावे लागणार आहे. तर आता हा रस्ता नव्याने करणेही शक्य नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :landslidesभूस्खलनSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग