शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जमीन हस्तांतरण: दोन उपजिल्हाधिकारी औरंगाबादला निलंबित, ३ अधिका-यांना नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 02:13 IST

वर्ग-२ जमीन हस्तांतरणासंदर्भाने विक्रीचे परवानगी आदेश देताना २२५ पैकी ११८ प्रकरणांत अनियमितता, जिल्हाधिका-यांचे अधिकार वापर केल्याचा ठपका ठेवत निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सोमवारी रात्री निलंबित केले.

औरंगाबाद : जिल्ह्यातील सिलिंग, वर्ग-२ जमीन हस्तांतरणासंदर्भाने विक्रीचे परवानगी आदेश देताना २२५ पैकी ११८ प्रकरणांत अनियमितता, जिल्हाधिका-यांचे अधिकार वापर केल्याचा ठपका ठेवत निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सोमवारी रात्री निलंबित केले.अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे, तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत यांना या प्रकरणात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले, उपजिल्हाधिकारी कटके यांनी वतन व कूळ जमिनींच्या प्रकरणांत परवानगी दिली. क्षेत्र, वारस, कूळ वहिवाट यांचा संदर्भ लागत नाही. जिल्हाधिकाºयांच्या अधिकारांचा वापर मंजुरी देताना झाला आहे. इनाम, खिदमतमास, मदतमास जमिनीसाठी परवानगी देताना व मागासवर्गीयांच्या जमिनी देताना ४२ प्रकरणांत पर्यायांचा विचार त्यांनी केला नाही. निवासी उपजिल्हाधिकारी गावंडे यांच्याकडे सिलिंग जमिनींचा मुद्दा होता. १० प्रकरणांत त्यांनी जिल्हाधिकाºयांचे अधिकार वापरले. कुठलीही पाहणी न करता परवानग्या दिल्या. चौकशीअंती ११८ प्रकरणांत अनियमितता झाल्याची बाब निदर्शनास आली, असे डॉ. भापकर यांनी सांगितले.महसूल बुडाला-’संबंधितांना बाजू मांडण्यासाठी नोटीस दिली आहे. त्यांच्या खुलाशानंतर गैरव्यवहार, गैरप्रकार, घोटाळा झाला की नाही हे स्पष्ट होईल. शिवाय त्यांना मॅटमध्ये किंवा कोर्टात जाण्याची मुभा राहणार आहे. अधिकारांचा गैरवापर, कागदपत्रे अपूर्ण ठेवणे तसेच शासनाचा ८ ते १० लाखांचा महसूल बुडाला आहे. डीएमआयसीतील १७ प्रकरणांत काहीही विचार केलेला नाही, असे डॉ. भापकर म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCorruptionभ्रष्टाचार