शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
5
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
8
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
9
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
10
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
11
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
12
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
13
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
14
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
15
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
16
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
17
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
18
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
19
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
20
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार

लाखो पेन्शनर्सचे बँकेतील हेलपाटे टळणार!

By admin | Updated: November 8, 2014 04:05 IST

केंद्र सरकार सध्या अभिनव योजनेवर विचार करीत असून, ती प्रत्यक्षात लागू झाल्यास देशभरातील लाखो पेन्शनर्सचा बँकेत किंवा पोस्टात

नवी दिल्ली : केंद्र सरकार सध्या अभिनव योजनेवर विचार करीत असून, ती प्रत्यक्षात लागू झाल्यास देशभरातील लाखो पेन्शनर्सचा बँकेत किंवा पोस्टात जाऊन ‘आपण अजूनही जिवंत आहोत’ हे सिद्ध करण्यासाठी करावा लागणारा त्रास वाचणार आहे.पेन्शनर्सना दरमहा पेन्शन अदा करण्यापूर्वी ती व्यक्ती खरोखरच जिवंत असल्याची खात्री करण्यासाठी सध्या काटेकोर नियम पाळले जातात. मात्र पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीने जेथून पेन्शन मिळते त्या बँकेत किंवा पोस्टात प्रत्यक्ष न जाताही, ती व्यक्ती जिवंत असल्याची खातरजमा करण्याची नवी पद्धत सरकार लागू करू पाहात आहे. खुद्द पंतप्रधान कार्यालयानेच याचा आग्रह धरल्याने लाखो पेन्शनर्सना लवकरच हा दिलासा मिळण्याची आशा आहे. यासाठी ‘आधार’ क्रमांक आणि कुठूनही वापरता येऊ शकेल अशी सॉफ्टवेअर यंत्रणा यांची सांगड घालून पेन्शनर्सना प्रत्यक्ष बँकेत किंवा पोस्टात न जाताही आपण जिवंत असल्याची खात्री पटवून देण्याची व्यवस्था विकसित केली जात आहे, असे माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव आर. एस. शर्मा यांनी सांगितले.सध्याच्या नियमांनुसार ज्या आस्थापनेकडून पेन्शन मिळते तिला आपण जिवंत असल्याचा पुरावा पेन्शनर व्यक्तीने वर्षातून किमान एकदा तरी देणे बंधनकारक आहे. विविध ११ प्रकारचे पेन्शन सरकारकडून दिले जाते व त्या प्रत्येकासाठी जिवंत असण्याच्या दाखल्याचे स्वरूप निरनिराळे आहे. मात्र असा दाखला पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीने जेथून पेन्शन मिळते त्या बँकेत किंवा पोस्टात वर्षातून किमान ेएकदा स्वत: जाऊन सादर करण्याखेरीज पर्याय नाही. पती किंवा पत्नीचे फॅमिली पेन्शन घेणाऱ्यांनाही हे बंधन लागू आहे. खूप आजारी असलेल्या किंवा अपंगत्व आलेल्यांचा याला अपवाद केला जाऊ शकतो. तरीही जिवंत असलेल्या व्यक्तीलाच पेन्शन दिले जाईल याची पूर्ण खात्री करण्याची जबाबदारी पेन्शन देणाऱ्या आस्थापनेवर येतेच. यामुळेच पेन्शनरला बँकेच्या एखाद्या ठरावीक शाखेतून किंवा ठरावीक पोस्ट आॅफिसातूनच दरमहा पेन्शन मिळेल, अशी व्यवस्था सध्या केलेली आहे. पेन्शन द्यायच्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी आवश्यक असलेले मूळ दस्तऐवज त्या बँक शाखेत किंवा पोस्टात जपून ठेवलेले असतात, त्यामुळे असे केले जाते. अलीकडे म्हणजे गेल्या वर्षी फेब्रुवारीत केंद्रीय व्यय विभागाने यात थोडी शिथिलता आणली. परिणामी आता पेन्शनरना ज्या बँकेतून पेन्शन मिळते त्या बँकेच्या कोणत्यागी शाखेत जिंवत असल्याचा दाखला नेऊन देण्याची सोय झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)