शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

२००६नंतरचे सेवानिवृत्त होणार लखपती

By admin | Updated: February 10, 2015 00:06 IST

हा निर्णय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी विशेष अनुमती याचिकेमुळे उद्भवलेल्या सिव्हील अपिल ९०८/१३मध्ये दि. ३० जानेवारी २०१३ रोजी दिलेल्या निर्णयानुसार घेण्यात आला आहे.

आनंद त्रिपाठी - वाटुळ- दिनांक १ जानेवारी २००६ रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या वा मृत पावलेल्या पात्र निवृत्तिवेतनधारक व कुटुंब निवृत्तिवेतनधारकांसाठी शासनाने खूषखबर दिली आहे. मृत्यू -नि-सेवा उपदानाची कमाल मर्यादा ७ लाख करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे सेवानिवृत्तांना आणखी दोन लाख रूपये मिळणार आहेत.हा निर्णय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी विशेष अनुमती याचिकेमुळे उद्भवलेल्या सिव्हील अपिल ९०८/१३मध्ये दि. ३० जानेवारी २०१३ रोजी दिलेल्या निर्णयानुसार घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार १ जानेवारी २००६ रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या वा मृत पावलेल्या पात्र निवृत्तिवेतनधारकांना व कुटुंबाला अनुज्ञेय असलेली रक्कम एकरकमी अदा करण्याचा आदेश ४ फेब्रुवारी २०१५च्या वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार देण्यात आला आहे. परंतु उपदानाच्या फरकाच्या रकमेवर व्याज अनुज्ञेय नसल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.सहाव्या वेतन आयोगानुसार केंद्राप्रमाणेच राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यू - नि - सेवा उपदानाची मर्यादा ७ लाख असायला हवी होती. परंतु राज्य शासनाने मात्र ५ लाखांप्रमाणेच अद्यापपर्यंत उपदान दिले होते. आता शासनाच्या या निर्णयामुळे २००६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या लाखो कर्मचाऱ्यांना फरकाची एकरकमी रक्कम सरळ पेन्शन खात्यात जमा होणार असल्याने उतार वयामध्ये मोठा आधार निर्माण झाला आहे.याबाबत वरिष्ठ कार्यालयाच्या सुचनेनंतर संबंधित कोषागारामार्फत ही फरकाची रक्कम पेन्शनधारकांच्या खात्यात एकरकमी जमा होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.