शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

लखलखते दिवे, नक्षीदार तबक

By admin | Updated: September 5, 2016 03:20 IST

गणेशोत्सव काही तासांवर आल्याने बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी पुजा साहित्याच्या खरेदीसाठी भक्तांची झुंबड उडाली आहे.

स्नेहा पावसकर,

ठाणे- गणेशोत्सव काही तासांवर आल्याने बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी पुजा साहित्याच्या खरेदीसाठी भक्तांची झुंबड उडाली आहे. चांदीचे, काचेचे, चिनी मातीचे आकर्षक-लखलखते दिवे, आरतीसाठी-पुजेसाठी नक्षीदार तबक, विविध डिझाइनच्या चौरंगांनी बाजारपेठा सजल्या आहेत. समया, पाट, फुलदाण्या, उदबत्तीची घरे, चंदनाची उटी लावण्यासाठी तबक, धुपारती-कर्पूर आरतीसाठी पात्र अशा नाना प्रकारच्या पूजा साहित्याने दुकाने खचाखच भरली आहेत. विविध आकाराचे डायमंड जडवलेला दिवा हा यंदा सुरेख पर्याय आहे. कमीतकमी २५० पासून ते ६५० रूपये किमतीत हे डायमंड दिवे उपलब्ध आहेत. रेखीव नक्षीकाम केलेले काचेचे दिवेही लक्ष वेधून घेत आहेत. मोर, देवीचा मुखवटा, कमळाच्या फुलाची नक्षी असलेल्या छोट्या समईपासून ते अगदी ५-६ फुटांपर्यंतच्या समया विक्रीसाठी आहेत. यातही व्हाईट मेटल समया ३०० रूपयांपासून पुढे उपलब्ध आहेत. बाप्पाची आरतीसाठी पंचपाळे, निरांजन, तबक अशी सामग्रीही नव्या ढंगात उपलब्ध आहे. रेडीमेड आरतीचे ताट १५०-२०० रूपयात उपलब्ध आहे. यातही डिझाइन करून सजविलेले कलर ताट किंवा सिल्व्हर ताट २५० ते ४५० रूपयांना मिळते. काही दुकानांमध्ये काचेचे आकर्षक नक्षीकाम केलेले आरतीचे ताटही उपलब्ध आहे. त्याची किंमत ५० रूपयांपासून पुढे आहे. होमहवनासाठी लागणारे होमकुंडही वेगवेगळ््या आकारात उपलब्ध आहे.आरतीसाठी लागणारे टाळ ७० ते २०० रूपयांच्या घरात आहेत.>प्रतिष्ठापनेवेळी लागणारे पाट, तसेच पूजा मांडण्यासाठी लागणारे विविध आकारातील नक्षीदार चौरंगही २०० रूपयांपासून पुढे उपलब्ध आहेत. चौरंगामध्येही सिल्व्हर रंग दिलेला लाकडी चौरंग आकर्षक आहेत.