शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
5
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
6
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
7
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
8
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
9
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
10
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
11
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
12
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
13
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
14
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
15
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
16
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

आता अशा 'लाडक्या बहि‍णींना' १५०० रुपयांऐवजी केवळ ५०० रुपयेच मिणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 21:18 IST

खरे तर, ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, त्याच महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा महिलांची संख्या जवळपास ८ लाख एवढी आहे. अशा महिलांना पुढील महिन्यापासून लाडकी बहीण योजनेतून केवळ ५०० रुपयेच मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. यावरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

राज्यातील महायुती सरकारने गेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेची प्रचंड चर्चाही झाली. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. मात्र आता, नमो शेतकरी योजनेतील पात्र महिलांना, लाडकी बहीण योजनेतून १५०० रुपयांऐवजी केवळ ५०० रुपयेच मिळणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. यासंदर्भात विचारले असता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टच शब्दात भाष्य केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

खरे तर, ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, त्याच महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा महिलांची संख्या तब्बल ८ लाख एवढी आहे. अशा महिलांना पुढील महिन्यापासून लाडकी बहीण योजनेतून केवळ ५०० रुपयेच मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. यावरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

यासंदर्भात विचारले असता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "आमचे म्हणणे आहे की, यांपैकी कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा. केंद्राची योजना ही त्यांना मिळेलच. केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्था-अर्थी काहीही संबंध नाही. कारण पंतप्रधान मोदीजी यांनी ती देशातील शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे. जर असे काही असेल, तर ही ५०० रुपयांची योजना न घेता १५०० रुपयांचा लाभ घ्यावा. कुठला लाभ निवडायचा हे ऐच्छिक. हे आपण लाडक्या बहिणींवर सोपवले आहे."  

अदिती तटकरे यांनीही दिले स्पष्टीकरण -अदिती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले आहे, "दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच, इतर शासकीय योजनांचा १५०० रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे. त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा १००० रुपये लाभ घेत असलेल्या ७७४१४८ महिलांना उर्वरित फरकाचे ५०० रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे."

अदिती पुढे म्हणाल्या, "एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून, सदर प्रक्रियेत दिनांक ३ जुलै २०२४ नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद आहे. तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अपप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रशासकीय आकलन कच्चे आहे किंवा योजनेच्या देदीप्यमान यशाने त्यांचे मनोबल खचले आहे. विरोधकांच्या या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत ही मला खात्री आहे."

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाState Governmentराज्य सरकार