शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लाडका भाऊ योजना ५० वर्षांपूर्वीची? दानवेंच्या दाव्याने शिवसेनेत 'खळबळ', विरोधक कामाला लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 14:15 IST

आदित्य ठाकरेंनी लाडका भाऊ योजना पण सुरु करावी असा मुद्दा काढताच शिंदेंनी त्यांना पलटवार करत लाडक्या भावासाठी देखील योजना आणली असल्याचे म्हटले होते.

राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण आणि लाडका भाऊ अशा अनुदान देण्याच्या योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने जाहीर केल्या आहेत. यावरून आता राज्यात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांत लढाऊ रंगली आहे. आदित्य ठाकरेंनी लाडका भाऊ योजना पण सुरु करावी असा मुद्दा काढताच शिंदेंनी त्यांना पलटवार करत लाडक्या भावासाठी देखील योजना आणली असल्याचे म्हटले होते. आता यावर ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खळबळजनक दावा केला आहे. 

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना निव्वळ तरुणांची फसवणूक आहे, असे ते म्हणाले आहेत. ही योजना १९७४ पासून महाराष्ट्रात सुरू आहे. सगळ्या योजनांना रोजगार प्रोत्साहन, प्रशिक्षण पहिल्यापासून दिलेले आहे. या योजनेमध्ये नवीन काही नाही. सरकार जनतेची आणि तरुणांची फसवणूक करत आहे, असा आरोप दानवे यांनी केला आहे. 

जुन्याच योजना मुख्यमंत्र्यांच्या नावाने सुरू करून नवीन दाखविण्यात येत आहेत. तरुण पिढीने या योजनेच्या नावाला फसू नये. यांना निवडणुकीच्या तोंडावर लाडका भाऊ , लाडकी बहीण आठवू लागले आहे. प्रत्यक्षात या योजना जुन्याच आहेत, असा दावा दानवे यांनी केला आहे. 

तर यावर शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी दानवे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या योजनांचा खोटा प्रचार सुरू असल्याची टीका करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते यांना अजून 'आव्हान'  आणि 'आवाहन' यातील फरक कळत नाही, असा टोलाही सावंत यांनी लगावला आहे. 

लाडक्या बहीणीला देखील 5 हजारांच्यावर पैसे द्या - यशोमती ठाकूरमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे. या योजनेत त्यांनी सहा, आठ आणि बारा हजार असे मानधन देणार असल्याचे जाहीर केले आहे. लाडक्या भावाला सहा, आठ आणि बारा हजार देताय तर लाडक्या बहीणीला पंधराशे का? महिलांची किंमत एवढी कमी आहे का? असा सवाल करत महिलांना देखील 5 हजारांच्यावर पैसे द्यावेत अशी मागणी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे. 

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेEknath Shindeएकनाथ शिंदेvidhan sabhaविधानसभा