शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

महाराष्ट्रातील कापूस शेतीचा ताळेबंद तोट्यात

By admin | Updated: February 17, 2015 00:33 IST

निसर्गाच्या अवकृपेमुळे पांढरं सोनं समजलं जाणाऱ्या कापसाचं उत्पादन एकरी अवघ्या ३ ते ४ क्विंटलवर येऊन ठेपल्याने कापूस शेतीचा ताळेबंद तोट्यात आला आहे.

ब्रह्मानंद जाधव- मेहकर निसर्गाच्या अवकृपेमुळे पांढरं सोनं समजलं जाणाऱ्या कापसाचं उत्पादन एकरी अवघ्या ३ ते ४ क्विंटलवर येऊन ठेपल्याने कापूस शेतीचा ताळेबंद तोट्यात आला आहे. कापसाचा उत्पादन खर्च एकरी २३ हजार ३५० रुपये असून, उत्पन्न १८ हजार रुपयांपर्यंत होत आहे. खर्च जास्त व उत्पादन कमी होत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं पांढरं सोनं मातीमोल झालं आहे.पावसाच्या हुलकावणीमुळे खरीप हंगामातील पीक लागवडीची मुदत संपल्याने बहुतांश शेतकऱ्यांना कापसावरच अवलंबून राहावे लागले. त्यामुळे सन २०१३-१४ च्या कापूस हंगामाच्या तुलनेत सन २०१४-१५ च्या हंगामात कापसाची लागवड १० टक्क्यांनी वाढली. राज्यात सुमारे ४१ लाख हेक्टर क्षेत्रावर, तर विदर्भात सुमारे १७ लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरणी करण्यात आली; परंतु पावसाने लांब दडी मारल्यामुळे राज्यातील ४१ लाख हेक्टरवरील कपाशी पिकाला फटका बसला आहे. पावसाच्या हुलकावणीबरोबरच कपाशी पिकावर पॅराविल्टसारख्या विविध भयावहरोगांचे आक्रमण मध्यंतरी झाले होते. परिणामी राज्यातील कापूस उत्पादनात ३० टक्के घट झाली. सद्य:स्थितीत कापूस वेचणीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून, एकरी सुमारे ३ ते ४ क्विंटलच कापसाचे उत्पादन होत आहे. शेतकऱ्यांना कापसाला एकरी खर्च २३ हजार ३५० रुपये आला असून, उत्पन्न मात्र केवळ १८ हजार रुपयांपर्यंत होत आहे. त्यामुळे कापूस उत्पादनात शेतकऱ्यांना तोटा सोसावा लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. ४पश्चिम वऱ्हाडात शेतकरी सोयाबीनला पसंती देतात; परंतु यावर्षी मान्सून उशिरा आल्याने सोयाबीनच्या पेरणीची मुदत निघून गेली. त्यामुळे पश्चिम वऱ्हाडातील शेतकऱ्यांना कापसाकडे वळावे लागले. बुलडाणा जिल्ह्यात ७ हजार ८५० हेक्टर क्षेत्र, अकोला जिल्ह्यात ८ हजार ६७५ हेक्टर क्षेत्र, तर वाशिम जिल्ह्यात ६ हजार ७२५ हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरणी करण्यात आली; परंतु नैसर्गिक संकटामुळे पश्चिम वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यातील २३ हजार २५० हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिकाला फटका बसला. कापसाला भाव मिळेना४गत चार वर्षांपासून कापसाला भाव मिळत नसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना झळ सोसावी लागत आहे. यावर्षी कापसाला सरासरी ४ हजार रुपये भाव मिळत आहे. २०१३-१४ साली कापसाला सुमारे ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. त्याआधी सन २०१२-१३ मध्ये ३ हजार ५०० रुपये व सन २०११-१२ मध्ये ३ हजार रुपये असे दर होते. गत चार वर्षांपासून भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.कपाशीचा एकरी ताळेबंदपूर्व मशागत१८०० रुपयेबियाणे१५०० रुपयेलागवड मजुरी७५० रुपयेखत४८०० रुपयेफवारणी मजुरी२५०० रुपयेफवारणी औषधी४५०० रुपयेआंतर मशागत३५०० रुपयेकापूस वेचणी४००० रुपयेएकूण खर्च२३३५० रुपयेसरासरी उत्पन्न४ क्विंटलप्रति क्विं.दर४५०० रुपयेमिळकत१८००० रुपयेनुकसान५३५० रुपये