शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार वसंत आबाजी डहाके यांना जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 17:39 IST

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा 'जनस्थान पुरस्कार २०१९' ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके  यांना जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई  - कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा 'जनस्थान पुरस्कार २०१९' ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके  यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये , सन्मानपत्र आहे. या पुरस्काराचे वितरण २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनी , कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी नाशिक येथे समारंभात प्रदान करण्यात येईल.

यशवंत चव्हाण प्रतिष्ठान येथे मंगळवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. संजय जोशी, सदानंद बोरसे, मोनिका गजेंद्रगडकर , विलास खोल व रेखा इनामदार यांनी एकमताने डहाके यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. जनस्थान पुरस्काराचे यंदाचे १५ वे वर्ष असून दोन वर्षांनी एकदा या पुरस्कार दिला जातो. या पूर्वी , विजया राजाध्यक्ष, अरुण साधू , भालचंद्र नेमाडे, इंदिरा संत , विजय तेंडुलकर अशा दिग्गजाना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.'योगभ्रष्ट', 'शुभवर्तमान', 'शुन:शेष' , 'चित्रलिपी', 'वाचाभंग' हे काव्यसंग्रह, 'अधोलोक', 'प्रतिबद्ध'  आणि 'मर्त्य' या कादंबऱ्या तर यात्रा-अंतयात्रा व मालटेकडीवरून हे लेख संग्रह, साहित्य आणि दृश्यकला यांसारखे समीक्षात्मक लेखन डहाके यांनी केले आहे. त्याचप्रमाणे मराठी साहित्यातील कोश वाडमयात त्यांनी मोलाची भर घातली आहे. १९६६ साली ‘योगभ्रष्ट’ या दीर्घ कवितेमुळे ते प्रकाशात आले. “चित्रलिपी” या संग्रहाकरिता २००९ सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. फेब्रुवारी २०१२ च्या चंद्रपूर येथे झालेल्या ८५ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. कृतज्ञतापूर्वक स्वीकारसाहित्य क्षेत्रात कुसुमाग्रज यांच्या नावाने दिला जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित होणे ही आनंदाची गोष्ट आहे. मराठी साहित्य क्षेत्रातील हा महत्वाचा पुरस्कार आहे. त्यामुळे या सन्मानाचा कृतज्ञ भावनेने स्वीकार करत आहे.  - वसंत आबाजी डहाके

टॅग्स :Kusumagrajकुसुमाग्रजmarathiमराठी