शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
3
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
4
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
5
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
6
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...
7
रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार; 'हा' मोठा ग्रुप टाटा सन्स सोडणार?
8
एक नंबर! गोड खाऊनही कमी करता येतं वजन; फक्त माहीत असायला हवी योग्य वेळ अन् पद्धत
9
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
10
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
11
Shravan Shukravar 2025: श्रावणातल्या कोणत्याही एका शुक्रवारी भरा देवीची ओटी आणि 'असा' मागा जोगवा!
12
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
13
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
14
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
15
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
16
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
17
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
18
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
19
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
20
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल

कुलवेम गावठाणात ‘पाणीबाणी’, पाण्याविना नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 07:11 IST

गोराई येथील कुलवेम गावठाणात कित्येक दिवसांपासून पाण्याची भीषण समस्या भेडसावत आहे. येथील ५०हून अधिक घरांतील रहिवाशांना पाण्यासाठी केवळ एका टाकीवर अवलंबून राहावे लागत आहे. महापालिकेकडून या ठिकाणी जलवाहिनी बसविण्यास मुहूर्त मिळत नसल्याने पाण्यासाठी रहिवाशांना वणवण करावी लागत आहे.

- सागर नेवरेकरमुंबई - गोराई येथील कुलवेम गावठाणात कित्येक दिवसांपासून पाण्याची भीषण समस्या भेडसावत आहे. येथील ५०हून अधिक घरांतील रहिवाशांना पाण्यासाठी केवळ एका टाकीवर अवलंबून राहावे लागत आहे. महापालिकेकडून या ठिकाणी जलवाहिनी बसविण्यास मुहूर्त मिळत नसल्याने पाण्यासाठी रहिवाशांना वणवण करावी लागत आहे.कुलवेम गावात एक जुनी टाकी असून, तिथे सायंकाळी ५ वाजता पाणी भरण्यासाठी रहिवाशांची गर्दी होते. टाकीतून मिळणारे पाणी रहिवासी दैनंदिन कामासाठी वापरतात. गावातल्या रहिवाशांसह पाड्यातील रहिवासीही पाण्यासाठी गावातल्या टाकीवर अवलंबून आहेत. त्यामुळे गावातील रहिवाशांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. परिणामी, रहिवाशांमध्ये पाण्यावरून वारंवार वाद होतात. महापालिका पाण्याचे बिल पाठविते. पाणीबिल भरण्यासाठी वारंवार तगादा लावला जातो, परंतु रहिवाशांना पुरेसे पाणी मिळेल, याची तरतूद करण्याची आवश्यकता महापालिकेला वाटत नाही. त्यामुळे मुबलक पाणी मिळत नसतानाही आम्ही त्याचे बिल का भरावे, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. पाण्याची समस्या महापालिकेच्या सातत्याने निदर्शनात आणूनही याकडे महापालिका लक्ष देत नसल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.गेल्या वर्षीही येथील पाण्याचा प्रश्न महापाल्ोिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडल्याचे वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘यंदाही पाण्याची टंचाई दिसत आहे. पाण्याची पाइप लाइन आहे. मात्र, गेल्या कित्येक दिवसांपासून पाणीच नाही. पाणी विकत घेऊन पाण्याच्या टाक्या भरल्या जातात, तसेच गावात काही विहिरी आहेत, परंतु विहिरीचे पाणी हे पिण्यायोग्य नसल्याने इतर कामासाठी पाण्याचा उपयोग केला जातो. महापालिका आयुक्तांना ई-मेलच्या माध्यमातून पाण्याची समस्या सांगण्यात आली आहे. यावर अद्याप आयुक्तांचे उत्तर आलेले नाही.’पाण्याचा एक थेंबही नाहीजलवाहिन्या बसविण्यात आल्या आहेत. मात्र, त्यातून पाणीपुरवठा होत नाही. मुख्य जलवाहिनी रस्त्यावरून टाकण्यात आली आहे. रस्त्यावर जागोजागी रिसॉर्ट आणि हॉटेल्स सुरू झाले आहेत. त्यामुळे जलवाहिनीतील पाणी यांना पुरविण्यात येत असावे, त्यामुळे गावातील रहिवाशांना पाणी मिळत नाही. कधी-कधी तर पाण्याचा एक थेंबही मिळत नाही.- आॅलिव्हर राणा,स्थानिक रहिवासी.गावठाणात सर्वेक्षण सुरूपाण्याच्या समस्येबाबत कुलवेम गावठाणात सर्वेक्षण सुरू आहे. कुठे पाणी कमी आहे, कुठे पाणी पोहोचत नाही, तसेच रहिवाशांच्या काय समस्या आहेत, ते जाणून घेण्यासाठी महापालिकेचे सर्वेक्षण सुरू आहे. पाण्याच्या स्रोताला धक्का लागला असून, पाण्याचा दाब कमी झाल्याची शक्यता आहे. पाण्याचा दाब किती आहे, याचा मापदंड काढून वरिष्ठापर्यंत सर्व माहिती पोहोचविली जाणार आहे. त्यानुसार, पाण्याचा दाब कसा वाढवता येईल, याचा निर्णय वरिष्ठ घेतील.- सागर लाड, कनिष्ठ अभियंता, आर/मध्य विभाग, महापालिका.पाणीचोरीचा आरोपकुलवेम गाव, अप्पर कोळीवाडा, लोअर कोळीवाडा या ठिकाणी रहिवाशांना पाणीच मिळत नाही, परंतु रहिवाशांना पाण्याचे बिल भरपूर येते. जे काही थोड्या प्रमाणात पाणी मिळते, ते रहिवाशांना थोडे-थोडे वाटून घ्यावे लागते. त्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडण होते. मनोरी येथे अनधिकृत लॉजिंग सुरू आहेत. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात चोरीला जाते. नगरसेवक असताना पाण्याचे काम हाती घेतले होते, परंतु हे काम अर्धवट केले गेले. पाण्याचा दाब हा खूप कमी आहे. पाण्याच्या समस्येवर आयुक्तांकडे बैठक घेतली जाईल.- शिवानंद शेट्टी, माजी नगरसेवक.लवकरच कामाचा ‘श्रीगणेशा’!रस्त्याच्या कडेला राहणाºया रहिवाशांना पुरेसे पाणी मिळतेय का, हे आधी तपासले पाहिजे. गावातील रहिवाशांना पाणी मिळत नाही, ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे दुसरी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करत आहोत. या कामाची निविदाही मंजूर झाली असून, काम सुरू करत असताना एका गावातून दुसºया गावात जलवाहिनी टाकावी लागेल. मात्र, पहिल्या गावातील लोकांनी या कामास विरोध केला होता. त्यामुळे त्यांची समजूत काढून नवीन जलवाहिनी टाकल्याशिवाय रहिवाशांना पुरेसे पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.- रमाकांत बिरादर, सहायक आयुक्त-आर/मध्य विभाग, महापालिका.

टॅग्स :Mumbaiमुंबईwater shortageपाणीटंचाई