शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
2
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
3
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
4
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
5
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
6
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
7
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
8
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
9
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
10
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
11
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
12
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
13
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
14
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
15
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
17
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
18
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
19
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
20
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:52 IST

Kothrud Petrol at 86 Rupees: आज अचानक पुण्यातील कोथरुडमधील एका पेट्रोल पंपावर ८६ रुपयांना प्रति लीटर पेट्रोल मिळू लागल्याने मोठी झुंबड उडाली होती. 

पुण्यासह महाराष्ट्रात १०३-१०४ रुपयांच्या पुढेच पेट्रोलचे दर आहेत. गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले तरी इंधनाचे दर मात्र कमी झालेले नाहीत. अशातच इथेनॉल मिक्स करून झाले, तरीही सरकारने पैसे कमी केलेले नाहीत. परंतू, आज अचानक पुण्यातील कोथरुडमधील एका पेट्रोल पंपावर ८६ रुपयांना प्रति लीटर पेट्रोल मिळू लागल्याने मोठी झुंबड उडाली होती. 

शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८६ व्या वाढदिवसाचे निमित्त होते. कोथरूड भागात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून एका पेट्रोल पंपावर ८६ रुपयांना पेट्रोल वाटप करण्यात आले. पेट्रोलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले. दुपारपर्यंत सुमारे ७०० हून अधिक वाहनचालकांनी या सवलतीचा लाभ घेतला.

राजकीय अर्थाची चर्चा:शरद पवारांच्या वाढदिवसाचे निमित्त असले तरी, येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाकडे राजकीय प्रचार म्हणून पाहिले जात आहे. सध्या पुणे शहर आणि उपनगरात इच्छुक उमेदवार देवदर्शन, पर्यटन, साड्या वाटप यांसारख्या विविध कार्यक्रमांमधून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोथरूडमधील '₹८६ पेट्रोल वाटप' हा त्याच निवडणुकीच्या तयारीचा एक भाग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kothrud Residents Throng Petrol Pump for Discounted Fuel

Web Summary : Kothrud saw a rush as petrol was sold at ₹86 per liter due to Sharad Pawar's birthday. Nationalist Congress Party workers organized the event, offering relief from high fuel prices. It's viewed as pre-election campaigning amid rising political activity.
टॅग्स :Petrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंपNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार