शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कोरेगाव भीमा हिंसाचार : प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती ‘बंद’ची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 06:27 IST

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर, अनिश्चित काळासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिल्याचे ठाणे येथे राहणाऱ्या एका साक्षीदाराने चौकशी आयोगाला मंगळवारी सांगितले.

मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर, अनिश्चित काळासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिल्याचे ठाणे येथे राहणाऱ्या एका साक्षीदाराने चौकशी आयोगाला मंगळवारी सांगितले. मिलिंद एकबोटे यांच्या वतीने अ‍ॅड. नितीन प्रधान यांनी साक्षीदाराची उलटतपासणी घेतली. कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर प्रकाश आंबेडकर यांनी अनिश्चित काळासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली का? आणि परिस्थिती हाताबाहेर जात आहे, हे बघून त्यांनीच बंद मागे घेण्याचा   आदेश दिला का, असे प्रश्न प्रधान  यांनी साक्षीदाराला केले. त्यावर साक्षीदाराने होकारार्थी उत्तर दिले.तसेच पुण्यात ३१ डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर होते आणि त्यांनीच दुसºया दिवशी म्हणजे १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन केले होते का, या प्रश्नावर उत्तर देताना साक्षीदाराने आपण हे सर्व वर्तमानपत्रात वाचल्याचे आयोगाला सांगितले.कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्याने, या साक्षीदाराने व त्यांच्या मंडळाच्या सहकाºयांनी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठीएक बस भरून माणसे नेली होती. मात्र, विजयस्तंभापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तेथे हिंसाचार सुरू झाल्याने, त्या सर्वांना जीव वाचवत परतावे लागले. त्यांच्या बसला आगही लावण्यात आली. कोरेगाव भीमा घटनेनंतर २ जानेवारीला ठाणे येथील श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेलो असता, पोलिसांनी तक्रार नोंदविण्यात टाळाटाळ केली आणि आम्हालाच पोलीस ठाण्यात डांबून ठेवले, असे या साक्षीदाराने सांगितले. त्यानंतर, आम्ही काही लोकांनाफोन करून पोलीस ठाण्यात बोलाविले. मात्र, त्या लोकांबरोबर मोठा जमाव आला. पोलीस तक्रार घेत नसल्याने जमावातील काही लोकांनी संबंधित परिसरातील आजूबाजूची दुकाने जबरदस्तीने बंद केली, अशीही माहिती या साक्षीदाराने आयोगाला दिली. राज्य सरकारही या साक्षीदाराची उलटतपासणी घेणार आहे.मुदतवाढीसाठी सरकारला अर्जकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नियुक्तकेलेल्या आयोगाची मुदत ५ आॅक्टोबरला संपत आहे. मात्र, अद्यापमुंबईतील काही साक्षीदारांची व पुण्यातील साक्षीदारांची साक्ष नोंदविण्याचेकाम पूर्ण झालेले नाही. त्यासाठी आणखी किती काळ लागेल, हे सांगतायेत नाही. याबाबत आयोगाला मुदतवाढ देण्यासंदर्भात काही दिवसांपूर्वीचअर्ज केला असून, राज्य सरकारच्या अधिसूचनेची प्रतीक्षा असल्याचेआयोगाच्या सचिवांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरnewsबातम्या