शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Konkan kanya Express: कोकणी चाकरमान्यांची लाडकी कोकणकन्या झाली ‘सुपरफास्ट’, ट्रेन नंबर आणि वेळापत्रकात मोठा बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 10:48 IST

Konkan Railway, Konkan kanya Express: कोकणी चाकरमान्यांची लाडकी असलेली कोकणकन्या एक्स्प्रेस आता सुपरफास्ट झाली आहे. त्यामुळे या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान आणि सुखकर होणार आहे.

मुंबई - कोकण रेल्वेच्या मार्गावरून धावणाऱ्या ट्रेन्सपैकी मुंबई-मडगावदरम्यान धावणारी कोकणकन्या एक्स्प्रेस ही चाकरमानी आणि कोकणी प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे. रात्रीच्या वेळी निघणारी ही गाडी आरामदायक प्रवासासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे कोकणकन्या एक्स्प्रेसचं आरक्षण नेहमीच फुल्ल असतं. दरम्यान, कोकणी चाकरमान्यांची लाडकी असलेली कोकणकन्या एक्स्प्रेस आता सुपरफास्ट झाली आहे. त्यामुळे या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान आणि सुखकर होणार आहे.

कोकण रेल्वे प्रशासनाने सुपरफास्ट श्रेणीत समावेश केलेल्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या वेळापत्रकामध्ये आणि क्रमांकामध्ये झालेल्या बदलाची माहिती पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार २० जानेवारी २०२३ पासून कोकणकन्या एक्स्प्रेस ही सुपरफास्ट म्हणून धावणार आहे. सुपरफास्ट श्रेणीत समावेश झाल्याने कोकणकन्या एक्स्प्रेसचा क्रमांक बदलला असून, कोकणी प्रवाशांना तोंडपाठ असलेल्या १०१११ आणि १०११२ या प्रचलित क्रमांकाऐवजी २०१११ आणि २०११२ या क्रमांकांसह धावणार आहे.

सुपरफास्ट श्रेणीमध्ये समावेश झाल्याने कोकणकन्या एक्स्प्रेसच्या वेळापत्रकामध्येही बदल झाला आहे. मुंबईवरून मडगावसाठी निघणारी २०१११ ही कोकणकन्या एक्स्प्रेस सीएएसएमटी स्थानकातून रात्री ११.०५ वाजता निघेल. त्यानंतर ही गाडी दादर (११.१७), ठाणे (११.४५), पनवेल (१२.२५), खेड (३.०४), चिपळूण (३.३०), संगमेश्वर (४.०२), रत्नागिरी (४.४५), राजापूर (५.५०), वैभववाडी (६.१०), कणकवली (६.४२), सिंधुदुर्ग (७.००), कुडाळ (७.१२), सावंतवाडी (०७.३२), पेडणे (७.५६) आणि मडगाव (९.४६) येथे पोहोचेल.

तर मडगावहून मुंबईकडे निघणारी २०११२ ही गाडी मडगावहून संध्याकाळी ७.०० वाजता निघेल. ही गाडी सावंतवाडी ( रात्री ८.३६), कुडाळ (रात्री ९.००), सिंधुदुर्ग (रात्री ९.१२), कणकवली (रात्री ९.२८), वैभववाडी ( रात्री ९.५६), राजापूर (रात्री २२.१४), रत्नागिरी (रात्री २३.१५), चिपळूण (रात्री १२.२८), खेड (रात्री १२.५५), पनवेल ( पहाटे ३.५५), ठाणे (पहाटे ४.४२), दादर (पहाटे ५.१२), मुंबई सीएसएमटी (पहाटे ५.४०) वाजता पोहोचेल.सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेsindhudurgसिंधुदुर्गgoaगोवा