शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर, सांगलीसह नगर, नाशिकला पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 07:13 IST

नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल मध्य महाराष्ट्राचा आणखी काही भाग, मराठवाड्याचा बहुतांश भागांत व विदर्भात सुरू झाली आहे.

- मुंबई/कोल्हापूर/औरंगाबाद/नागपूर/नाशिक : नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल मध्य महाराष्ट्राचा आणखी काही भाग, मराठवाड्याचा बहुतांश भागांत व विदर्भात सुरू झाली आहे. रविवारी कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागांत तसेच विदर्भात चांगला पाऊस झाला.कोल्हापूरला सायंकाळी तासभर पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शहरात पाणीच पाणी झाले. सांगली जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाऊस झाला. सातारा शहरातही पावसाने हजेरी लावली. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अहमदनगर जिल्ह्यात ब्राह्मणगावात शनिवारी रात्री अतिवृष्टी झाली. अडीच तासांत १२५ मिलिमीटर पाऊस झाला. धारणगाव, कोपरगाव येथे घरांमध्ये पाणी शिरले होते.औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी रात्री व रविवारी सकाळी अनेक भागांत दमदार पाऊस झाल्याने बळीराजा आनंदला आहे. नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यात शनिवारी रात्री पहिल्याच पावसाने दाणादाण उडविली. विदर्भात भंडारा, नागपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती जिल्ह्यात पाऊस झाला. वादळी पावसाने अमरावती जिल्ह्यात १०५ घरांचे नुकसान झाले आहे. राज्यात मान्सून सक्रीय झाला असला, तरी पावसाचे प्रमाण कमी आहे.मान्सून उत्तर प्रदेशात, मुंबई कोरडीच!अनुकूल हवामानामुळे मान्सूनचा प्रवास आता पूर्वोत्तरेकडील राज्यांच्या दिशेने वेगाने होत आहे. रविवारी मान्सूनने मध्य महाराष्ट्राचा काही भाग, मराठवाड्यासह विदर्भाचा काही भाग आणि उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग व्यापला आहे. पूर्वोत्तरेकडील राज्यांच्या दिशेने मान्सून आगेकूच करत असतानाच, दुसरीकडे मुंबई मात्र कोरडीच आहे. मान्सून मुंबईत दाखल होण्यास मंगळवार उजाडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशल