शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नागरी सहकारी बँका कोल्हापूर जिल्ह्यात, ठेवींत किती कोटींची वाढ.. जाणून घ्या

By राजाराम लोंढे | Updated: September 13, 2025 19:08 IST

स्पर्धेमुळेच कारभारावर अंकुश

राजाराम लोंढेकोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ४५ नागरी सहकारी बँकाकोल्हापूर जिल्ह्यात आहेत. या सगळ्याच बँका आर्थिकदृष्ट्या ताकदवान असून, तब्बल २९ बँकांचा निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे. यावरून बँकांची आर्थिक सक्षमता निश्चित होते. या बँकांच्या ठेवीत आर्थिक वर्षात तब्बल ९१८ कोटींची वाढ झाली असून, कर्जाच्या तुलनेत तिप्पटीने ठेवीमध्ये वाढ झाली आहे.बँका, पतसंस्था, साखर कारखाने, विकास संस्था, दूध संस्थांचे जाळे काेल्हापूर जिल्ह्यात विणले आहे. राज्याच्या तुलनेत कोल्हापुरात खऱ्या अर्थाने सहकार रुजला आणि वाढल्याने सहकार पंढरी म्हणून ओळखली जाते. इतर जिल्ह्यांत यापेक्षाही अधिक सहकारी संस्था असतील, पण इतक्या सक्षम संस्था महाराष्ट्रात एकाही जिल्ह्यात बघावयास मिळत नाहीत. त्याला येथील शेतकरी कारणीभूत मानला जातो. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केल्यास सर्वाधिक संस्था कोल्हापुरात आहेतच, त्याचबरोबर वित्तीय संस्थांची संख्याही तुलनेत अधिक आहे. येथे ४१ नागरी सहकारी बँका, १३७२ नागरी, ग्रामीण सहकारी पतसंस्था, ३५० पगार नोकरांच्या पतसंस्था तर एक जिल्हा मध्यवर्ती अशा १७६८ वित्तीय संस्था कार्यरत आहेत.केवळ संस्थांची संख्या अधिक नाहीतर येथील वित्तीय संस्थांमध्ये वर्षाला होणारी प्रगती नेत्रदीपक आहे. मागील २०२३-२४ आर्थिक वर्षापेक्षा २०२४-२५ मध्ये नागरी बँकांच्या ठेवीमध्ये तब्बल ९१८ कोटींची वाढ झाली आहे. कर्जाचे वाटप ३५९ कोटींने अधिक झाले असले तरीही वसुलीचे प्रमाण खूप चांगले आहे. तब्बल २९ बँकांचा निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे.

स्पर्धेमुळेच कारभारावर अंकुशयेथे नागरी बँकांची संख्या अधिक असल्याने व्यवसायात कमालीची स्पर्धा पाहावयास मिळते. कामकाज चुकीचे केले तर ग्राहक बाजूला जाईल, याची भीती बँक व्यवस्थापनाला असते. त्याचबरोबर या बँकांवरच स्थानिक राजकारण अवलंबून असल्याने नैतिक भीतीही प्रत्येकाच्या मनात असते.पश्चिम महाराष्ट्रात वित्तीय संस्थाजिल्हा - जिल्हा बँक - नागरी बँका - नागरी/ग्रामीण पतसंस्था - पगारदारांच्या पतसंस्था - एकूण संस्था कोल्हापूर - ०१ - ४५ - १३७२ - ३५० - १७६४ सांगली- ०१ - २० - १०२६ - १८० - १२२७ सातारा - ०१ - २२ - ६४७ - २११ - ८८१ 

कोल्हापुरातील बँकांचे विश्वस्त मंडळाबरोबरच सभासद, ग्राहकांचे कौतुक केले पाहिजे. येथे सुरुवातीपासून प्रत्येकाने आर्थिक शिस्त लावून घेतली आहे. त्यानुसारच कामकाज सुरू असल्याने नागरी सहकारी बँका अधिक ताकदीने काम करत आहेत.- अनिल नागराळे, बँकिंगतज्ज्ञ