शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'मास्क नाही तर प्रवेश नाही' कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची अभिनव मोहीम राज्यभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 17:49 IST

collectoroffice, nomask no entry, coronavirus, kolhapurnews 'मास्क नाही तर प्रवेश नाही' कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुरु केलेली आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गौरवलेली ही अभिनव मोहीम राज्यभर राबविण्याबाबत नगर विकास विभागाने काल 2 नोव्हेंबर रोजी शासन परिपत्रक प्रसिध्द केले आहे.

ठळक मुद्दे 'मास्क नाही तर प्रवेश नाही' कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची अभिनव मोहीम आता राज्यभर शासन परिपत्रक प्रसिध्द

कोल्हापूर : 'मास्क नाही तर प्रवेश नाही' कोल्हापूरचेजिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुरु केलेली आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गौरवलेली ही अभिनव मोहीम राज्यभर राबविण्याबाबत नगर विकास विभागाने काल 2 नोव्हेंबर रोजी शासन परिपत्रक प्रसिध्द केले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ' मास्क नाही मग प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तू नाही, सामाजिक अंतर नाही तर वितरणही नाही' अशी अभिनव मोहीम सुरु केली.

यात मास्कचा वापर, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझर यावर भर दिला आहे. ग्राहकाने मास्क घातला नसेल तर दुकानदार त्याला प्रवेश देणार नाही आणि दुकानदारांने घातला नसेल तर ग्राहक वस्तू खरेदी करणार नाही. याचे उल्लंघन झाल्यास ग्राहकांना दंड तसेच आस्थापना सीलबंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी देसाई यांनी दिले आहेत.या मोहिमेचा मुख्यमंत्र्यांनी गौरव करुन राज्यात इतर जिल्ह्यांनीही याचे अनुकरण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मुंबईत 'बेस्ट' च्या सर्व बस स्थानकावर याचे फलक लावण्यात आले आहेत. ही मोहीम राज्यभर राबविण्याबाबत नगर विकास विभागाचे उप सचिव शंकर जाधव यांनी काल 2 नोव्हेंबर रोजी शासन परिपत्रक प्रसिध्द केले आहे.नागरिकांमध्ये मास्क वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या शासन परिपत्रकात सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी मास्कशिवाय बाहेर पडू नये. यासाठी सर्व महानगरपालिका/ नगरपरिषदा/ नगरपंचायतींनी विशेष मोहीम राबवावी. यामध्ये मास्क वापरण्यासंदर्भात व्यापक प्रचार, प्रसार व प्रसिध्दी विविध माध्यमांव्दारे करणे.

जसे जागोजागी मोक्याच्या ठिकाणी बॅनर लावणे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आयुक्त/ मुख्याधिकारी यांनी विशेष दक्षता घेवून मोहीम राबविण्यात यावी. मोहीम राबविताना त्यामध्ये सर्व सामान्य नागरिकांचा सहभाग कसा वाढेल, यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांचा अवलंब करावा.

या उपरोक्त जे नागरिक मास्क किंवा प्रतिबंधक उपायांचा अवलंब करण्याकडे दुर्लक्ष करीत असतील अशा नागरिकांवर नियमांनुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी. मास्क नाही प्रवेश नाही याबाबत विशेष मोहीम राबवावी. हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या  www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक 202011021600541325 असा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर