शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘दशावतारा’च्या प्रसारासाठी कोकणी कलाकार घाटावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 20:41 IST

’दशावतार’ नाटक ही कोकणाची परंपरा आहे...

ठळक मुद्देकोकणातील या कलेला सातासमुद्रापार नेण्यासाठी नवीन पिढीचा प्रयत्नयात्रा किंवा उत्सवाच्या काळात मंदिरांमध्ये मध्यरात्री या लोकनाट्याच्या सादरीकरणाची प्रथा

पुणे : कोकणासारख्या मातीत रूजलेले अस्सल पारंपारिक लोकनाट्य म्हणजे ‘दशावतार’. परंतु काही जुनी मंडळी सोडली तर शहरातील नव्या पिढीला या लोककलेची अद्याप माहिती देखील नाही. तमाशा किंवा इतर तत्सम लोककलांना मिळालेला ‘राजाश्रय’देखील दशावताराला मिळू शकलेला नाही. परंतु सोशल मीडियाच्या युगातही तरूण पिढी ही कला जिवंत ठेवण्यासाठी पुढे सरसावली असून, ही कला कोकणापुरतीच मर्यादित न राहाता महाराष्ट्रासह बाहेरच्या भागातही या कलेला सन्मान मिळवून देण्यासाठी  त्यांची धडपड सुरू झाली आहे.    ’दशावतार’ नाटक ही कोकणाची परंपरा आहे. कोकणात आजही ही कला तग धरून असून, जत्रा, उत्सवांमध्ये दशावतार पाहाणा-यांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रातल्या इतर लोककला लोप पावण्याच्या स्थितीत असताना ‘दशावतारा’ कडे मात्र तरूण पिढीचा ओढा वाढत चालला आहे. कोकणातील या कलेला सातासमुद्रापार नेण्यासाठी नवीन पिढी प्रयत्न करीत आहे. ही कला सर्वदूर पोहोचविण्याचा विडा वेंगुर्ले स्थित  ‘रामेश्वर बाल दशावतार नाट्य’ मंडळाने घेतला आहे. शुक्रवारी ( 26 एप्रिल) हे मंडळ नवी पेठ स्थित निवारा सभागृह येथे सायंकाळी 5 वाजता ‘दशावतार’ चा प्रयोग करणार आहेत. त्यानिमित्त मंडळप्रमुख भैय्या गुरव व तरूण कलाकारांशी ‘लोकमत’ ने संवाद साधला.     ते म्हणाले,  ‘दशावतार’ कलेबद्द्ल तरूण पिढीमध्ये आवड निर्माण झाली आहे. त्यांना व्यासपीठही मिळू लागले आहे. शाळांमध्ये सरस्वतीपूजन केले जाते. तेव्हा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ‘दशावतार’ सादर केले जाते. त्यातील काही निवडक मुलांना आम्ही संधी दिली. ज्यायोगे ही कला त्यांच्यात रूजावी. लहान मुलांच्या गोड भाषेत सादर होणा-या नाट्याला प्रेक्षक उचलून धरत आहेत. सध्यस्थितीत हौशी आणि व्यावसायिक अशा दोन माध्यमातून ’दशावतार’ नाटक सादर केले जात आहे.  कालपरत्वे कलेच्या विषयांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पण वेशभूषेमध्ये बदल झाला आहे. फरक फक्त इतकाच आहे की मोठ्या कंपन्यांना राजाश्रय आहे पण आम्ही मात्र स्वखर्चाने नाटक करीत आहोत. हौशेखातर मुलांच्या कलागुणांना वाव द्यायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सोशल मीडियाच्या काळातही तरूण मुले या कलेकडे वळत असून, हे प्रमाण 10 टक्के असल्याचे त्यांनी सांगितले.---------------------------------------------------------------------------------------‘ दशावतार’ ही कोकणची पारंपारिक कला आहे. या कलेमधून पौराणिक माहिती मिळते. ही कला तरूण पिढीने टिकवायला पाहिजे असे वाटते. दशावतारच्या सादरीकरणातून पैसे फारसे मिळत नाहीत. एका कलाकाराला 300 रूपये मिळतात. ज्येष्ठ कलाकारांना निवृत्त झाल्यावर पुढे काय, असा प्रश्न पडतो. तरीही आम्ही हौशी तरूण मंडळी ही कला जगवण्यासाठी धडपडत आहोत. ही कला केवळ कोकणातच राहिली आहे. तिला महाराष्ट्रात आणि बाहेरही मंच उपलब्ध झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे- कौशल नातू, तरूण कलाकार’दशावतार’ काय आहे?’दशावतार’ हा कोकणातल्या लोकांच्या मनोरंजनाचा एक महत्वाचा स्रोत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोव्यात या कलाप्रकाराची विशेष ख्याती आहे.  यात्रा किंवा उत्सवाच्या काळात मंदिरांमध्ये मध्यरात्री या लोकनाट्याच्या सादरीकरणाची प्रथा आहे. साधारणपणे पूर्वरंग आणि उत्तररंग अशा दोन सत्रात दशावताराला भगवान विष्णूच्या दहा अवतारांचे पदर देण्यात आले आहेत. ही नाटके पौराणिक कथांवर आधारित असतात. दशावताराला नेपथ्य नसते. रंगमंचावर एक बाकडे मधोमध मांडलेले असते. बाजूला पेटीवाला, तबलेवाला आणि झांजवाला असे तीनच वादक असतात. आणि एवढयाच संपत्तीच्या जोरावर ही मंडळी आपली कला सादर करतात. 

टॅग्स :Puneपुणेartकला