शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

‘कोकण शिक्षक’ भाजपकडे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय; महाविकास आघाडीला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 07:49 IST

Vidhan Parishad Election Result: मागील निवडणुकीत मतांच्या फाटाफुटीमुळे गमावलेला कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ भाजपने पुन्हा एकदा ताब्यात घेतला आहे.

नवी मुंबई/ अलिबाग : मागील निवडणुकीत मतांच्या फाटाफुटीमुळे गमावलेला कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ भाजपने पुन्हा एकदा ताब्यात घेतला आहे. विजयाची शक्यता असलेले आपल्या पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना भाजपकडून उभे करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेळी यशस्वी ठरली. 

ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २०,६८३ मते मिळाली, तर अपक्ष म्हणून रिंगणात असलेले शेकापचे बाळाराम पाटील यांना मागील वेळेपक्षा कमी १०,९९७ मते मिळाली. पाटील यांची भिस्त फक्त रायगड जिल्ह्यावर होती. मात्र, भाजपने सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी दिली. भाजपप्रमाणेच त्यांना ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतून शिंदे गटाचेही पाठबळ मिळाले. 

महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तीन पक्षांचा पाठिंबा आणि रायगड जिल्ह्यातील शेकापची ताकद असूनही त्यांचा उमेदवार पराभूत झाला. या निवडणुकीला शिक्षक विरुद्ध संस्थाचालक असे स्वरूप देण्याची भाजपची खेळीही यशस्वी ठरली. या विजयामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात राजकीय खेळीसाठी चांगला समन्वय असल्याचे दिसून आले. शिंदे यांचा उमेदवार देऊन फडणवीस यांनी भाजपची एक जागा वाढवली. ही मतमोजणी कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांच्या देखरेखीखाली नेरूळमध्ये पार पडली. 

शिक्षकांचे प्रश्न सोडविल्याचा फायदाकोकण विभाग शिक्षण मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. २०१८ च्या निवडणुकीत भाजपमधील बंडखोरीमुळे शेकापचे बाळाराम पाटील विजयी झाले होते. मात्र, तेव्हा ज्ञानेश्वर म्हात्रे (शिवसेना) दुसऱ्या क्रमांकावर होते. पराभूत होऊनही त्यांनी शिक्षकांशी संपर्क ठेवला. त्यांचे प्रश्न हाती घेतले. त्याचा त्यांना फायदा झाला. 

ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिली पसंती- ज्ञानेश्वर म्हात्रे सुरुवातीपासून आघाडीवर होते आणि पहिल्याच पसंतीक्रमात विजयी झाले. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २०६८३, बाळाराम पाटील यांना १०९९७ मते पडली. गेल्यावेळेपेक्षा ती ८४० ने कमी आहेत. - रायगडवगळता इतर जिल्ह्यात आघाडीला मते मिळविण्यात अपयश आले. गेल्यावेळी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना ६,८८७ मते पडली होती. ती आता २० हजारांवर गेली. आघाडीचा उमेदवार म्हणून जरी बाळाराम पाटील यांचा पराभव झाला असला, तरी राजकीयदृष्ट्या हा शेकापला मोठा दणका असल्याचे बोलले जाते.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकBJPभाजपा