शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
3
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
4
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
5
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
6
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
7
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
8
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
9
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
10
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
11
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
12
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
13
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
14
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
15
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
16
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
17
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
18
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
19
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
20
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना गोळ्या घाला, कनसेचे प्रमुख बरळले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 6:58 PM

मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन आता 60 वर्षे पूर्ण होत आली असली तरी कन्नड भाषिक कर्नाटकमध्ये समाविष्ट झालेले बेळगाव, निपाणी, कारवार हे मराठी भाषिक प्रदेश अद्याप महाराष्ट्रात सामील होऊ शकलेले नाही.

बेळगाव -  सीमाभागात मराठी आणि कानडी भाषिकांमधील वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. कानडी भाषकांची संघटना असलेल्या कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषकांविरोधात अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली असून, मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना सीमेवर उभे करून गोळ्या झाडल्या पाहिजेत, असे विधान केले आहे.  मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन आता 60 वर्षे पूर्ण होत आली असली तरी कन्नड भाषिक कर्नाटकमध्ये समाविष्ट झालेले बेळगाव, निपाणी, कारवार हे मराठी भाषिक प्रदेश अद्याप महाराष्ट्रात सामील होऊ शकलेले नाही. त्यामुळे या सीमाभागात मराठी भाषिक आणि कानडी भाषिकांमध्ये वारंवार तणाव निर्माण होत असतो. दरम्यान, आज कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी मराठी भाषक आणि कर्नाटकमधील मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी झगडणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात गरळ ओकली आहे. ''गेल्या 64 वर्षांपासून बेळगावच्या जनतेला वेठीस धरणाऱ्या आणि  बेळगावातील कन्नड भाषिकांच्या स्वाभिमानास आव्हान देणाऱ्या, कर्नाटकमधील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना खासदांरानी कधी जाब विचारला आहे का?, खरंतर मराठी भाषिक एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना सीमेवर उभे  करून गोळ्याच झाडल्या पाहिजेत. एकदाच काय ते होऊन जाऊ दे. तसे झाल्यास आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा असेल, असे विधान भीमाशंकर पाटील यांनी केले आहे.  

टॅग्स :belgaonबेळगावMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकmarathiमराठी