शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...कितने आदमी थे, ६५ में से ५० निकल गये!; देवेंद्र फडणवीस यांची शोले स्टाईल टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 06:15 IST

मला अमिताभ बच्चन म्हटले गेले. पण मी दिसताे अमजद खानसारखा. पण मी हे नक्की विचारू शकतो की, ‘कितने आदमी थे...

मुंबई :

मला अमिताभ बच्चन म्हटले गेले. पण मी दिसताे अमजद खानसारखा. पण मी हे नक्की विचारू शकतो की, ‘कितने आदमी थे... ६५ मे से ५० निकल गये, और सब कुछ बदल गया,’  अशा शब्दांत उपमुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात शनिवारी शिवसेनेवर तोंडसुख घेतले. 

महाराष्ट्रापासून वेगळी करणार, महाराष्ट्राचे आता तुकडे पाडणार असे दरवेळचे डायलॉग आता महापालिका निवडणूक जवळ येईल तसे सुरू होतील, अहो! जरा डायलॉग तरी बदला, असे टोले त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसोबत मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणारच असेही ते म्हणाले. 

कॅबिनेट मंत्री झाल्याबद्दल मंगलप्रभात लोढा यांचा आणि मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल आशिष शेलार यांचा सत्कार षण्मुखानंद सभागृहात फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी फडणवीस म्हणाले की, निवडणूक जवळ आल्यावर भावनिक मुद्दे सुरू होतील. याला लोक कंटाळले आहेत. 

फडणवीस हे अमिताभ; शेलार बिनीचे शिलेदारफडणवीस हे राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत, असे लोढा म्हणाले. शेलार म्हणाले की, म्हणूनच फडणवीस जहाँ खडे होते है, लाइन वही से शुरू होती है. फडणवीस म्हणाले की युद्धासाठी शिवाजी महाराज बिनीच्या शिलेदारांना पाठवायचे, मुंबई सर करण्यासाठी श्रेष्ठींनी शेलार यांना पाठविले आहे.

ही तर मोदी पर्व संपल्याची नांदी : ठाकरेशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेत सत्ता हवी आहे, असे म्हणणे हे मोदी पर्व संपल्याची नांदी आहे, असे प्रत्युत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. ठाकरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, भाजपच्या धोरणानुसार वापर संपला की नवीन नाव शोधायचा असा प्रकार सुरु आहे. 

आशिष शेलार क्रिकेटशी संबंधित आहेत त्यांना आता राजकारणात ट्वेंटी, ट्वेंटी खेळायची आहे. एमसीएमध्ये शेलारांनी मुंबई प्रीमियर लीग सुरू केली आहे. आता पालिकेत मुंबई महापालिका विकास लीग तयार करायची आहे.     - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे