शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

kirit Somaiya Vs Sanjay Raut: कोर्लईनंतर अलिबागवरून किरीट सोमय्या खोटे ठरले; जमिन मालकच समोर आला, म्हणाला 'हो विकली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 18:51 IST

Kirit Somaiya Vs Sanjay Raut: संजय राऊतांनी अलिबाग येथे जमीन मालकावर दबाव टाकून जमीन घेतल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. यावर आता हा जमिन मालक समोर आला आहे. 

भाजपाचे नेते किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यात गेल्या काही काळापासून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. पुण्यात सोमय्या यांनी जंबो कोविड सेंटर घोटाळ्यात मध्ये राऊतांचा सहभाग असल्याचे आरोप केल्याने आणि ईडी कारवाईवरून राज्यातील राजकीय वातावरण पेटले आहे. राऊतांनी सोमय्या यांना दलाल आणि अन्य शब्द संबोधत सोमय्या पिता पूत्र जेलमध्ये जाणार असल्याचे भाकित केले आहे. आता सोमय्यांनी आरोप केलेल्या जमिन व्यवहारातील मालक समोर आला आहे. 

संजय राऊतांनी अलिबाग येथे जमीन मालकावर दबाव टाकून जमीन घेतल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. यावर आता हा जमिन मालक समोर आला आहे. 

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी अलिबाग येथे जमीन मालकाकडून दबाव टाकून जमीन घेतली असल्याचा आरोप केला होता. मात्र या आरोपावर लोकमतने थेट मूळ मालकाशी संवाद साधला. होय मीच संजय राऊत याना जमीन विकली मात्र आमच्यावर कोणताही दबाव नव्हता, खेळीमेळीच्या वातावरणात हा व्यवहार झाला आहे. आमचे घरगुती संबंध देखील चांगले असल्याने हा संपूर्ण व्यवहार झाला, असे हे मुळ जमिन मालक चंद्रकांत भिडे  म्हणाले. 1997 साली 60 ते 70 हजारात 1 एकर जमीन विकली आणि हा व्यवहार पूर्ण पणे पारदर्शक असल्याचे देखील भिडे यांनी सांगितले. 

किरीट सोमय्या यांनी कोर्लई गावामध्ये रश्मी ठाकरे यांचे १९ बंगले बेकायदेशीर पणे बांधल्याचा आरोप केला होता. प्रत्यक्षात तिथे एकही पक्के घर बांधलेले नाही, हे समोर आले आहे. तिथे काही वर्षांपूर्वी कच्च्या झोपड्या बांधल्या होत्या. त्यांची नोंद तेथील ग्रा. पंचायतकडे होती. संशयित रित्या मृत्यू झालेले आर्किटेक्ट अन्वय नाईक यांना तिथे रिसॉर्ट बांधायचे होते. परंतू तिथे निर्बंध असल्याने ती जमिन ठाकरेंनी विकत घेतली होती. ग्राम पंचायतने ठाकरेंना कर भरण्यास सांगितले होते, त्यानुसार ठाकरेंनी कर भरला होता. आता तिथे काहीच नसल्याने ग्रा. पंचायतने करातून ही प्रॉपर्टी वगळली आहे. 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याSanjay Rautसंजय राऊत