शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

"हिसाब तो देना पडेगा;" रवींद्र वायकरांच्या ED चौकशीनंतर किरीट सोमय्यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 11:43 IST

Ravindra Waikar ED : सक्तवसुली संचालनालयाने (ED) मंगळवारी शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ८ तास चौकशी केली.

सक्तवसुली संचालनालयाने (ED) मंगळवारी शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ८ तास चौकशी केली. वायकर हे जोगेश्वरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांच्या चौकशीने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेकांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू असल्याचं दिसून येत आहे. यावरुन, महाविकास आघाडीचे नेते ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप करत आहेत. दरम्यान, या कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

"हिशोब तर द्यावाच लागेल," अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी यानंतर दिली. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीटही केलं आहे. "उद्धव ठाकरे यांचे बिझनेस पार्टनर शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ईडी चौकशी सुरू झाली आहे. मोठ्या मोठ्या बिल्डर्सकडून, महापालिका कंत्राटदारांकडून जो किकबॅक मिळाला आहे, मग तो एफएसआय, कोणत्या कंपनीतील फ्रॉड या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी," असंही ते म्हणाले.

वायकर यांची चौकशी किरीट सोमय्या यांनी केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपानंतर वायकर यांची चौकशी केल्याचं समजतंय. वायकर यांनी ईडीकडे काही कागदपत्रेही सादर केली आहेत. तसंच गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीला बोलावण्यात येऊ शकतं, असेही ईडीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, वायकर यांना नेमकं कोणत्या प्रकरणातील चौकशीसाठी बोलविण्यात आलं होतं, हे अद्याप सांगण्यात आलेलं नाही. तर, वायकर यांनीही ईडीच्या चौकशीबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. 

टॅग्स :Ravindra Waikarरवींद्र वायकरKirit Somaiyaकिरीट सोमय्याEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय