शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Kirit Somaiya on Nawab Malik: उद्धव ठाकरेंचेही दाऊदशी संबंध आहेत का? आणखी एकाचा नंबर लागणार; किरीट सोमय्यांचा मोठा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 12:40 IST

Kirit Somaiya on Nawab Malik's D Gang connection: गोवा वाला कंपाऊंडमध्ये जे आर्थिक व्यवहार झाले, ती करोडो रुपयांची संपत्ती काही लाखांत मलिकना कशी काय मिळाली? हे कसे शक्य होऊ शकते? असा सवालही सोमय्या यांनी केला. 

नवाब मलिक हे दाऊद गँगचे सदस्य आहेत हे सिद्ध झाले आहे. जेलमध्ये गेल्यानंतर नवाब मलिक यांना मंत्रीपदी कायम ठेवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पण डी गँगशी संबंध आहेत का, या बाबत उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा, असे आव्हान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिले आहे. 

शरद पवार आणि दाऊद यांचे संबंध आहेत, हे उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरेंनी हजार वेळा सांगितलं असेल. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी पार्टनरशिप केली. त्यांची दाऊदशीपण पार्टनरशीप आहे का, असा सवाल करत उद्धव ठाकरेंना शरद पवारांविरोधात न्यायालयात मोर्चा काढण्यास सोमय्या यांनी सांगितले. 

गोवा वाला कंपाऊंडमध्ये जे आर्थिक व्यवहार झाले, ती करोडो रुपयांची संपत्ती काही लाखांत मलिकना कशी काय मिळाली? हे कसे शक्य होऊ शकते? असा सवालही सोमय्या यांनी केला. मातोश्रीपासून चार किमीवर गोवावाला कंपाऊंड आहे. उद्धव ठाकरे यांचे एजंट यशवंत जाधव यांनी गेल्या काही वर्षांत जुन्या बिल्डिंग विकत घेतल्या आहेत. नवाब मलिक यांना वाचवणारे उद्धव ठाकरे यांना उत्तर द्यावे लागणार आहे. बाळासाहेबांची भाषणे मी स्वतः स्टेजवर बसून ऐकली आहेत. 1992, 93 मध्ये बॉम्ब स्फोट, दंगली झाल्या त्यानंतर शरद पवार आणि दाऊद एका विमानात गेले, अशी भाषणं मी ऐकली आहेत. मुलाने सगळेच गहाण ठेवायचं हे फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात, अशी टीका सोमय्या यांनी केली आहे. 

आणखी एका नेत्यावर कारवाई सुरु झाली आहे. ईडीने कारवाईची प्रक्रिया सुरु केली आहे. चार-पाच जण आहेत, त्यांच्यापैकी कोणा एकाचा पुढचा नंबर लागणार असा इशारा सोमय्या यांनी दिला.  

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेnawab malikनवाब मलिक