शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

खासदार निधी वापरण्यात राज्यात किरीट सोमय्या प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 06:50 IST

लोकांची किती कामे केली व किती विकास केला याचा आणि निवडून येण्याचा काही संबंध नाही असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा म्हटले होते़.

ठळक मुद्देमहाराष्ट्र २९ व्या क्रमांकावर : ४१५ कोटींचा तोटा

- विवेक भुसेपुणे : संसदेतील खासदारांना त्यांच्या स्थानिक मतदारसंघाच्या विकासासाठी दरवर्षी ५ कोटी रुपयांचा निधी मिळतो़. अन्य राज्यातील खासदार या निधीचा पूरेपूर वापर करुन आपले स्थान बळकट करताना दिसत असताना राज्यातील खासदार मात्र हा निधी पूर्णपणे खर्च करण्यात उदासिन असल्याचे दिसून आले़. खासदार निधीचा वापर करण्यात महाराष्ट्राचा देशभरात २९ क्रमांक लागतो़ जर राज्यातील खासदारांनी आपला मिळालेला खासदार निधीचा पूरेपूर उपयोग केला असता तर किमान १ हजार २०० कोटी रुपयांची कामे झाली असती़. पण, खासदारांनी निधीचा वापर न केल्याने किमान ४१५ कोटी ६८ लाख रुपयांचा राज्याचा तोटा झाला आहे़. राज्यात खासदार निधीचा सर्वाधिक वापर करण्यात किरीट सोमय्या यांचा पहिला क्रमांक लागला असून त्यांनी २५ कोटी ६१ लाख रुपयांचा वापर केला आहे़. लोकांची किती कामे केली व किती विकास केला याचा आणि निवडून येण्याचा काही संबंध नाही असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा म्हटले होते़. त्याचा प्रत्यय यंदा तिकीट वाटपावर पाहिल्यावर दिसून येत आहे़. किरीट सोमय्या यांनी राज्यात सर्वाधिक निधी खर्च केला असला तरी राजकीय सोयीसाठी व शिवसेनेचा विरोध लक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही़. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे खासदार निधी वापरण्यात शेवटून दुसरे आहेत़. पण त्यांच्या उमेदवारीला असलेला विरोध दूर करण्यासाठी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मध्यस्थी करावी लागली़. देशातील खासदारांचा विकास निधी वापर करण्याची राष्ट्रीय सरासरी १८ कोटी २ लाख रुपये आहे़. त्यापेक्षा महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी कमी खासदार निधीचा वापर केला आहे़.खासदार निधी खर्च करण्यात देशात छत्तीसगडचा तिसरा क्रमांक लागतो़. पण, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने तेथील सर्व खासदारांची तिकीट कापण्यात आली आहे़. छत्तीसगडच्या खासदारांनी विकास निधीचा वापर करुन केलेल्या कामाची तुलना केली तर महाराष्ट्रातील बहुसंख्या खासदारांना यंदा तिकीट मिळू शकले नसते़. महाराष्ट्रातील खासदारांपेक्षा बिहार, उत्तर प्रदेशासह छोट्या छोट्या राज्यातील खासदार विकास निधी खर्च करण्यात किती तरी पुढे आहेत़. 

सर्वाधिक खासदार निधीचा वापर करणारे खासदार (कोटी रुपये)किरीट सोमय्या         २५़६१रामदास तडस        २३़५७राहुल शेवाळे        २०़८८पूनम महाजन        २०़६२डॉ़ श्रीकांत शिंदे    २०़३९हिना गावीत        २०़२३़़़़़़़़़़़़़़़़सर्वात कमी खासदार निधीचा वापर करणारे खासदार (कोटी रुपये)डॉ़ प्रीतम मुंडे        ७़३२रावसाहेब दानवे        १०़६७भावना गवळी        १०़५५रक्षा खडसे        १०़८९सुभाष भामरे        १२़५३़़़़़़़़़देशातील सर्वाधिक खासदार निधी वापरणारे खासदार (कोटी रुपये)जनार्दन सिंग सीग्रीवाल     ३१़ ४५लक्ष्मण गिलुवा        २७़४८टी़ जी़ वेंकटेश बसू    २६़८०चेंडी पासवान        २६़६१संध्या रॉय        २६़६०उदीत राज        २६़४१़़़़़़़़़़़सर्वाधिक खासदार निधीचा वापर करणारी राज्ये (सरासरी, कोटी रुपये) चंदीगड        २५़४२हिमाचल प्रदेश        २२़८१छत्तीसगड        २२़४० मणिपूर         २२़१६गुजरात        २१़४५महाराष्ट्र        १५़५९ (२९ वा क्रमांक)़़़़़़़सर्वाधिक खासदार निधीचा वापर करणो पक्ष (सरासरी, कोटी रुपये)पट्टाली मक्कल काटची    २३़६२आम आदमी पक्ष    २२़१९जनता दला युनायटेड    २२़०१लोकजन शक्ती        २१़२७अण्णा द्रमुक        २०़७५़़़़़़

टॅग्स :Puneपुणेlok sabhaलोकसभाKirit Somaiyaकिरीट सोमय्याPoliticsराजकारण