मुंबई : पत्नीला छेडत असल्याने संतापलेल्या पतीने एका तरुणाची भररस्त्यात कोयत्याने हत्या केल्याची घटना आज चुनाभट्टीत घडली. याबाबत चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.श्रीनिवास लक्का (२९) असे आरोपीचे नाव आहे. तो पत्नीसह चुनाभट्टीतील आझाद गल्ली येथे राहत होता. याच परिसरात राहणारा मयत मनोज सरपया (३३) हा गेल्या सात ते आठ महिन्यांपासून आरोपीच्या पत्नीची छेड काढत होता. श्रीनिवासने समज देऊन मनोजने छेड काढणे थांबविले नाही. त्यामुळे संतापलेल्या श्रीनिवासने शंकर मंदिर परिसरात गाठून मनोजवर कोयत्याने वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. येथील रहिवाशांनी त्याला तत्काळ सायन रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
भररस्त्यात तरुणाची कोयत्याने हत्या
By admin | Updated: December 23, 2015 02:04 IST